सहकार मल्टीस्टेट कायद्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी - डॉ. ज्ञानेश्वर मुळे, रवळनाथ व एनसीयुआयतर्फे राष्ट्रीय वेबिनार - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2020

सहकार मल्टीस्टेट कायद्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी - डॉ. ज्ञानेश्वर मुळे, रवळनाथ व एनसीयुआयतर्फे राष्ट्रीय वेबिनार

डॉ. ज्ञानेश्वर मुळे
कागणी : सी एल वृत्तसेवा
         सहकाराचे मोठे योगदान असून मल्टीस्टेट कायद्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला अधिक बळकटी आले. दिवसेंदिवस देशातील श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी रुंदावली आहे, त्यामुळे बहुजन हिताय, बहुजन सुखायचा मंत्र देणाऱ्या सहकार चळवळीची शिवाय पर्याय नाही किंबहुना देशाला आत्मनिर्भर बनविण्याची ताकद आहे, असे मत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य तथा विदेश मंत्रालयाचे माजी सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केले. 
         नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी संघ(एंनसी यूआय) आणि श्री रवळनाथ को-ऑपरेटिव हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड, आजरा मल्टीस्टेट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'सहकारी संस्था समोरील कोविडोत्तर आव्हाने व उपाय उपाययोजना' या विषयावरील वेबिनारच्या बीज भाषणात ते बोलत होते.
 डॉ. मुळे म्हणाले, देशाच्या जडणघडणीत सहकाराचे मोठे योगदान असून मल्टीस्टेट कायद्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला अधिक बळकटी आले सामान्य माणसाच्या आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहकारी संस्थांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत विज्ञान मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता प्रा डॉ ए एम गुरव यांनी कोविडोउत्तर काळातील सहकारी संस्था समोरील आव्हाने आणि उपाय योजना यावर तर शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे प्रा डॉ. व्ही बी ककडे यांनी सहकारातील मानवी भांडवलाचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक प्राचार्य डॉ. बी एम हिर्डेकर यांनी सहकारी संस्थेतील शासन या विषयावर तर राष्ट्रीय सहकारी संघाचे कार्यकारी संचालक डॉक्टर व्हीं के दुबे यांनी मल्टीस्टेट सहकारी कायदा 2002 ची वैशिष्ट्ये आणि केंद्रीय निबंधकाने पारित केलेली परिपत्रके यासंदर्भात मार्गदर्शन केले.
         रवळनाथचे संस्थापक एम एल चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले उपाध्यक्ष प्रा व्हि के मायदेव यांनी आभार मानले. महाराष्ट्र गोवा कर्नाटक दिल्ली आंध्रप्रदेश तामिळनाडू आदी राज्यातील शेकडो अभ्यासक व प्रतिनिधी उपस्थित होते. एनसीयू आयच्या संचालिका संध्या कपूर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment