![]() |
मारूती पाटील |
तेऊरवाडी - सी .एल. वृत्तसेवा
मौजे चिंचणे (ता . चंदगड) गावचे उपसरपंच किरण मारूती पाटील यांचे वडील मारूती गंगाराम पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सोमवार दि .१७ रोजी सकाळी कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. काल रविवार दि. १६ रोजी त्यांचे लहान सख्ये बंधू हरिश्चंद्र गंगाराम पाटील यांचे निमोनियामुळे निधन झाले होते. लहान भावाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने मोठा भाऊ मारूती याना तीव्र झटका आला . यामध्येच त्यांचा दुर्देवी अंत झाला. अगदी २४ तासांच्या आतच दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment