शिवनगेचे चंद्रकांत मोरे यांची ऑडीनरी लेफ्टनंटपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2020

शिवनगेचे चंद्रकांत मोरे यांची ऑडीनरी लेफ्टनंटपदी निवड

कागणी : सी एल वृत्तसेवा
        मूळचे शिवनगे (ता. चंदगड) व सध्या हिंडलगा येथील रहिवासी भारतीय सैन्य दलाचे सुभेदार चंद्रकांत दत्तू मोरे यांची स्वतंत्र दिनानिमित्त ऑडीनरी लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. चंद्रकांत हे 1993 साली मराठा रेजिमेंट मध्ये भरती झालेे. यानंतर त्यांनी 28 वर्ष विविध ठिकाणी सेवा दिली आहे. त्यांचे वडील व माजी सैनिक दत्तू, आई शांताबाई, पत्नी सविता, माध्यमिक शिक्षक आर. आर. देसाई, बामणे यांचे त्यांना प्रोत्साहन लाभले.  
     चंद्रकांत यांचे प्राथमिक शिक्षण शिवनगे येथील मराठी विद्यामंदीर, त्यानंतर माध्यमिक शिक्षण गावातील ताम्रपर्णी विद्यालयात झाले. त्यांनी कोवाड येथील कला महाविद्यालयातून व मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. सध्या ते अरुणाचल प्रदेश येथे पॅरा स्पेशल फोर्स मध्ये कार्यरत   कार्यरत आहेत त्यांच्या या  नियुक्तीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment