अतिवृष्टीमुळे कलिवडे येथे घरांची पडझड होवून नुकसान, भरपाईची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2020

अतिवृष्टीमुळे कलिवडे येथे घरांची पडझड होवून नुकसान, भरपाईची मागणी

कलिवडे (ता. चंदगड) येथील अतिवृष्टीने जमीनदोस्त झालेले पांडुरंग कदम यांचे घर. 
सी. एल. वृत्तसेवा, दौलत हलकर्णी
              कलिवडे (ता.चंदगड )येथील पांडुरंग बाळू कदम यांच्या रहत्या घराची भिंत शनिवार रोजी पहाटे चार वाजता कोसळल्याने कदम कुटुंबीयांना अतिवृष्टीचा फार मोठा फटका बसला आहे. यामध्ये घरगुती साहित्य सह साधारणता तीन लाखाचे नुकसान झाले आहे सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. सदर पडलेले घराची नुकसाण भरपाई मिळावी अशी विनंती येथील ग्रामस्थांनी व कदम कुटुंबियांनी केली आहे.
       कलिवडे येथील सावित्री तानबा कदम या कुटुंबावर ही निसर्गाने घाला घातला असून मागील वर्षी त्यांना खूप मोठा फटका बसला होता. मागील वर्षी त्यांचे राहते घर पूर्णतः कोसळले होते वयोवृद्ध कदम दाम्पत्याला दानशूर व्यक्ती व विविध संस्थांनी माणुसकीचं बळ देऊन आर्थिक मदत केली होती. शिवाय हिंडल्को बेळगाव इंडस्ट्रीज सावित्री तानबा कदम यांना पत्राशेड उभा करून दिले होते. शनिवार रोजी पांडुरंग बाळू कदम यांच्या घराची भिंत सदर पत्राशेड असलेल्या ठिकाणी कोसळली त्यामुळे त्यांचेही नुकसान झाले आहे.

No comments:

Post a Comment