कोरोनायोध्या डॉ. पाटील कुटुंबियांचा उत्कृष्ठ कार्याबद्दल गौरव, कोण आहेत हे डाॅक्टर दांम्पत्य , कोणी केला गौरव? - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2020

कोरोनायोध्या डॉ. पाटील कुटुंबियांचा उत्कृष्ठ कार्याबद्दल गौरव, कोण आहेत हे डाॅक्टर दांम्पत्य , कोणी केला गौरव?

पुर व कोरोनाकाळात उत्कृष्ठ सेवा बजावल्याबद्दल डाॅ. पाटील कुटुंबियांचा दाटे येथील भीम गर्जना युवक मडंळामार्फत सत्कार झाला. 
सी. एल. वृत्तसेवा, दौलत हलकर्णी
       कोरोना काळात समाजातील प्रत्येक घटक आपल्या परीने सेवा बजावत आहे. यात मुख्यता डॉक्टरांची भुमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे. असेच दाटे ( ता. चंदगड ) येथील साई  क्लिनीकचे डॉ. विलास पाटिल यांनी त्याच्या बजावलेल्या सेवेचे कौतुक सर्वत्र होताना दिसत आहे.
           डॉ. पाटिल हे मुळचे चंदगड तालुक्यातील हल्लारवाडी गावचे होय. गेली बरीच वर्षे दाटे येथे त्यांचा दवाखना आहे. समाजातील गोरगरीबांची सेवा करण्याची भावणा मनात ठेऊण अल्प मोबदल्यात ते कार्यरत आहेत. ह्या कार्यात त्याच्या पत्नी डॉ. प्रभा पाटिल देखिल त्यांना साथ देत असतात. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभाव काळात आपला दवाखना सतत सुरु ठेऊण दाटे तसेच परीसरातील खेडयातील लोकांची सेवा ते करत आहेत. गेल्या काही दिवसापुर्वी हल्लारवाडी व दाटेच्यामध्ये असणाऱ्या ताम्रपर्णी नदिवरील पुलावर पुराचे पाणी आले असताना देखिल त्या पाण्यातुन चालत दाटे येथे येऊन आपला दवाखाना सुरू ठेऊण पेशंट तपासणी, तसेच अत्यावश्यक पेशंटना योग्य ठिकाणी उपचारासाठी पाठवण्याचे कार्य अखंड चालु ठेवले आहे.
         अशा या कोरोना योध्याचा सत्कार 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनादिवशी दाटे येथील भीम गर्जना युवक मडंळामार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी मडंळाचे अध्यक्ष सचिन कांबळे, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.No comments:

Post a Comment