दक्षता मित्र मंडळ कुदनुर च्या वतीने सत्कार प्रसंगी रेस्क्यू फोर्स चे जवान.
|
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
विविध समाजोपयोगी कार्यात आघाडीवर असणाऱ्या कुदनुर ता. चंदगड येथील दक्षता गणेश मित्र मंडळाने निरपेक्ष भावनेने समाजसेवा करणाऱ्या पाथ रेस्क्यू फोर्स च्या जवानांच्या कार्याची दखल घेत नागरी सन्मान केला. यावर्षी चंदगड तालुक्यात विशेषतः कोवाड परिसरात ताम्रपर्णी नदीला दोनदा आलेल्या पूर तसेच दुंडगे पुलावरून नदीत पडून मृत्यू झालेल्या कुदनुर येथील तरुणाचा तीन दिवस यशस्वी शोध घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यात कुदनुर व परिसरातील श्रीपाद सामंत, रामा पाटील, परशराम जोशी, विशाल परब, युवराज नौकुडकर, गजानन मोहनगेकर आदींचा समावेश आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या पथकाला शासन-प्रशासन स्तरावरून कोणत्याही प्रकारचे अनुदान, संरक्षण किंवा मानधन नाही. या टीमला सत्कार प्रसंगी कुदनूर गावचे माजी सैनिक ज्योतिबा कृष्णा गुंडकल यांनी एक हजार रुपयांची प्रोत्साहनपर मदत प्रदान केली. यावेळी दक्षता गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment