कालकुंद्री येथे पर्यावरण पूरक गणेश विसर्जनला १०० टक्के प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

27 August 2020

कालकुंद्री येथे पर्यावरण पूरक गणेश विसर्जनला १०० टक्के प्रतिसाद

कालकुंद्रीत गणेश विसर्जन व निर्माल्य दान उपक्रमाची सुरुवात करताना ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी व भाविक.
 कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
       गंदगी मुक्त भारत अभियान अंतर्गत कालकुंद्री (ता. चंदगड) ग्रामपंचायत मार्फत पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करण्यात  आले. दोन दिवसापूर्वी ताम्रपर्णी नदीवरील घाटाची संपूर्ण स्वच्छता केली होती. गौरी गणपती विसर्जन प्रसंगी नदीघाटावर भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी ग्रामविकास अधिकारी व्ही बी भोगण यांनी ध्वनिक्षेपकावरून मास्क वापरा, सोशल डिस्टन्स पाळा तसेच निर्माल्य संकलनाचे आवाहन केले. याला  भाविकांनी १०० टक्के प्रतिसाद देत ग्रापं मार्फत लावण्यात आलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीत निर्माल्य टाकले. गेल्या चार-पाच वर्षात नदीघाटावर गणेश विसर्जनाच्यावेळी निर्माल्य दान उपक्रम राबवून त्याचा कंपोस्ट खतासाठी उपयोग केला जातो. या उपक्रमाचा आदर्श परिसरातील काही गावांनी घेतल्यामुळे ताम्रपर्णी नदी दूषित  होण्याचे प्रमाण कमालीचे घटले आहे. नदीघाटावर काहिलीत गणेश मूर्ती विसर्जन करून तेथेच दान करण्याचा उपक्रमही सुरू आहे. विसर्जन प्रसंगी ग्राम विकास अधिकारी व्ही बी भोगण, प्रशासक  बी एम कांबळे, ट्रॅक्टर मालक प्रल्हाद पाटील, दशरथ पाटील, सागर पाटील, फकीरा लोहार, नरसु कांबळे, उदय सुतार, आदींनी परिश्रम घेतले. घाटाची सफाई करण्यासाठी कल्लाप्पा बागडी, कल्लाप्पा सुतार, पुंडलिक गोपाळ पाटील,  सुगंधा महादेव कांबळे, सुनिता कल्लाप्पा पाटील, नंदा शिवाजी पाटील, हमीदाबी सद्रोद्दीन मोमीन, मनीषा सुरेश जाधव, इरफान मोमीन, शोभा रघुनाथ पाटील, लक्ष्मी गोंधळी, बाबाजान मुल्ला आदी विविध जाती-धर्माच्या लोकांनी श्रमदानाने घाट स्वच्छ करून विविधतेत एकतेचे दर्शन घडविले.

No comments:

Post a Comment