नेसरी येथे गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त - चंदगड लाईव्ह न्युज

27 August 2020

नेसरी येथे गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त

नेसरी येथे बंदोबस्त  करताना सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश माने
नेसरी -सी .एल. न्यूज 
     नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे आज गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस ठाण्याने कडक  पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
सर्वांनी शांततेत घरगुती गणरायाचे विसर्जन करावे,कोरोना प्रादुर्भावाची  सर्वांनी काळजी घेऊन शासनाच्या नियमांचे पालन करावे असे ,सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश माने यांनी  सी .एल. न्यूजशी बोलताना सर्व गणेश भक्ताना आवाहन केले . आज सकाळपासून नेसरी येथे बंदोबस्त ठेवण्यात आला आहे . यावेळी विना मास्क,विना कागदपत्रे तसेच तीन सीट घेऊन  दुचाकी फिरविणाऱ्यावर कारवाई करणेत येत आहे. 

No comments:

Post a Comment