शरीर सौष्ठव स्पर्धेतील `कामगार श्री` विजेते, एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व कृष्णा गवेकर - चंदगड लाईव्ह न्युज

12 August 2020

शरीर सौष्ठव स्पर्धेतील `कामगार श्री` विजेते, एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व कृष्णा गवेकर

दुंडगे (ता. चंदगड) येथील हरहुन्नरी, मनमिळावू व्यक्तिमत्व कृष्णा गवेकर यांचे मंगळवार 11 ऑगस्ट 2020 रोजी आपल्या सर्वांना सोडून या जगामधून निघून गेले, त्यांच्याविषयी.
कृष्णा गवेकर
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
         कोल्हापूर जिल्ह्याला कुस्तीची फार मोठी परंपरा आहे. सन 1956 मध्ये नोकरीसाठी मुंबईमध्ये आलेल्या कृष्णा गवेकर यांनी आपली गिरणीत नोकरी सांभाळून व्यायामाचा छंद जोपासला. ना. म. जोशी मार्ग(डीलाई रोड) आरोग्य धाम या कामगार कल्याण मंडळाच्या व्यायाम शाळेत त्यांनी शरीर सौष्ठवाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली . कठोर मेहनतीच्या जोरावर शरीर सौष्ठवात नैपुण्य मिळवले व मुंबई तसेच राज्य पातळीवरील विविध शरीर सौष्ठव स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली होती.
                                                जाहिरात
जाहिरात
         फेब्रुवारी 1967 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाने, जाम्बोरी मैदान वरळी येथे आयोजित केलेल्या राज्य स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत त्यांनी मानाचा `कामगार श्री` हा किताब पटकावला होता. हा किताब पटकवणारे दुडगे गावचे कै कृष्णा गवेकर हे चंदगड तालुक्यातील किंबहुना कोल्हापूर जिल्ह्यातील पाहिले रहिवाशी होते.
         हा किताब पत्कवल्यानंतर त्यांनी 7 वर्षे कामगार कल्याण मंडळाच्या फिजिकल कल्चरल क्लब वर सल्लागार म्हणून काम पाहिले. या काळात त्यांनी अनेक होतकरू शरीर सौष्ठव पटूंना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.
हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध विनोदी नट मेहमूद यांनीही त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतले होते.
        उत्तम शरीर सौष्ठव व रुबाबदार व्यक्तित्वामुळे त्यांनी काही काळ मराठी कामगार रंगभूमीवर ही आपल्या अभिनयाची छाप पाडली. `शिवा रामोशी` या अस्सल ग्रामीण बाजाच्या नाटकात यांनी वटवलेल्या `शिवा रामोशी` या नायकाच्या भूमिकेचे त्यावेळीचे आघाडीचे नट `श्री शाहू मोडक` व चित्रतारका `उषा किरण` यांनी कौतुक केले. अडकुर गावचे सुपुत्र व सुप्रसिद्ध नट `श्री कृष्णकांत दळवी` हे त्यांचे जिवलग मित्र. असे हे हरहुन्नरी, मनमिळावू व्यक्तिमत्व मंगळवार 11 ऑगस्ट 2020 रोजी आपल्या सर्वांना सोडून या जगामधून निघून गेले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.



No comments:

Post a Comment