निटटूर येथील सुरेशराव विठ्ठलराव चव्हाण-पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2020

निटटूर येथील सुरेशराव विठ्ठलराव चव्हाण-पाटील यांचे निधन

सुरेशराव चव्हाण-पाटील
चंदगड / प्रतिनिधी 
मूळचे निटटूर (ता. चंदगड) व सध्या आयोध्यानगर,बेळगाव येथे वास्तव्यास असलेले पं.स.चे माजी उपसभापती,ताम्रपर्णी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेशराव विठ्ठलराव चव्हाण-पाटील (वय ७१) यांचे बुधवारी पहाटे पाच वाजता हृदयविकाराने निधन झाले.चंदगड तालुक्याचे माजी आमदार व्ही के चव्हाण-पाटील यांचे जेष्ठ चिरंजीव होत.कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचे मेेेव्हणे होते.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून नातवंडे असा परिवार आहे. हवाईदलाचे निवृत्त विंग कमांडर प्रतापराव चव्हाण-पाटील, महाराष्ट्र विज वितरण महामंडळाचे निवृत्त कार्यकारी अभियंता गुलाबराव चव्हाण-पाटील, सामाजिक कार्यकर्ते विश्वासराव चव्हाण-पाटील यांचे ते बंधू तर यशवंतनगर येथील काजू उद्योजक विक्रम, बेळगाव येथील आर्किटेक्ट इंजिनिअर दिपाली यांचे ते वडील होत. 


No comments:

Post a Comment