![]() |
रामजन्मभूमी येथील भूमीपूजनाच्या कार्यक्रमानिमीत्त आमदार संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उचगाव येथे दीप पूजन आले. यावेळी उपस्थित धनंजय जाधव,शालू फर्नांडिस, उमेश शिंदोळकर,पवन देसाई, विजय खटावकर. |
उचगाव / प्रतिनिधी
उचगाव येथील शंकर-पार्वती कार्यालयामध्ये राम जन्मभूमी मध्ये होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून उचगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रीरामाच्या मूर्तीच्या पूजनाचा तसेच दीप पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व भाजपा जिल्हाध्यक्ष संजय पाटील हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव बेळगाव जिल्हा अल्पसंख्यांक सरचिटणीस शालू फर्नांडिस, ग्रामीण मंडळ उपाध्यक्ष उमेश शिंदोळकर ,माझी युवा मोर्चा सेक्रेटरी उमाशंकर देसाई, माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण जाधव, पार्वती मेडिकलचे मालक पवन देसाई, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष विनोद पावशे, विजय खटावकर मिथिल जाधव, अनिल पाटील, सचिन देसाई आदी उपस्थित होते. यावेळी संजय पाटील आणि धनंजय जाधव यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन पवन देसाई यांनी केले तर आभार अनिल पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment