कानूर खुर्द येथील मल्लनाथ हायस्कूलचा १००% निकाल - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2020

कानूर खुर्द येथील मल्लनाथ हायस्कूलचा १००% निकाल

चंदगड / प्रतिनिधी
        मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा कानूर खुर्द (ता. चंदगड) येथील श्री मल्लनाथ हायस्कूलचा निकाल १०० % लागला आहे. परिक्षेला एकूण विद्यार्थी ४२ प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ५ विद्यार्थी ९१.२० % ते ९ ५.४०% असे विशेष प्राधान्याने उत्तीर्ण झाले आहेत .विद्यालयात अनुक्रमे कु.अक्षता रजनिकांत पाटील ९५.४० %, रोहन दिपक चव्हाण ९ ४.४० %, कु. सुहानी शिवाजी गावडे ९१.४० % कु.साक्षी भिकाजी झेंडे ९ १.२० % , कु. श्वेता अशोक पाटील ९१.२० % या विद्यार्थ्यांनी नंबर मिळवले. 
      उर्वरीत ३७ विद्यार्थ्यापैकी पैकी १२ विद्यार्थी ८० % ते ९ १ . % , १२ विद्यार्थी, ७१ % ते ८० % , १० विद्यार्थी ६१ % ते ७० % या प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाले आहेत. तर उर्वरीत ३ विद्यार्थी ५१ % ते ६० % या व्दितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक पी. बी. चौगुले, एस. झेड तुर्केवाडकर, आर. डी. चौगुले, एस. के. कांबळे, व्ही. पी. कागणकर, व्ही. आर. गावडे, विद्या रावराणे  यांचे  मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष पी. बी. पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 

No comments:

Post a Comment