गौराईचे उत्साहात झाले आगमन - चंदगड लाईव्ह न्युज

25 August 2020

गौराईचे उत्साहात झाले आगमन

कोवाड सी एल वृत्तसेवा (संजय पाटील ) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साधेपणाने गणपती बाप्पाचे शनिवारी आगमन झाले.गणपती बाप्पांच्या पाठोपाठ मंगळवार दि 25 रोजी गौराईचे देखील मोठ्या भक्तिमय वातावरणात चंदगड तालुक्यातील कर्यात भागासह सगळीकडे आगमण झाले.

मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या गौराई साठी सोमवार पासूनच सर्वत्र बाजारपेठामध्ये गोराई चे डहाळे, गंगा गौरी,मुखवटे बरोबरच भाजी खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली होती.बापांच्या आगमनाबरोबरच दोन दिवसांनी आई गौराई माहेरी येते.गौराई राणावणात वाढलेली असल्यामुळे तिला विविध प्रकारच्या पालेभाज्यांचा नैवैद्य दाखविला जातो.आणि गौराई ला पुजले जाते.खासकरून भोपळ्याची पानं,शेपू यासह पाच पालेभाज्या एकत्र करून भाजी भाकरीचा नैवैद्य दाखविला जातो.गौराईची विधिवत प्रतिष्ठापना करण्यासाठी सुवासिनी सजवलेला कलश,हळदी कुंकू,गौराई,तुळशीची पाने,हळदीची पाने,झेंडू पाने घेऊन नदीकाठी जातात.त्याठिकाणी कलश पाण्याने भरून विधिवत गौराईला घरी आणून पूजन करतात त्यामुळे सकाळपासूनच कोवाड या ठिकाणी ताम्रपर्णी नदीकाठी गौराई ला आणण्यासाठी सर्व सुवासिनींनी गर्दी केली होती.सांज शृंगार करून आलेल्या  महिलांनी गौराईच्या गाण्यानी पारंपारिक पध्दतीने गौराईचे मोठ्या भक्तिमय वातावरणात पूजन केले.

गौराईचे पूजन करण्यासाठी कोवाड येथील नदीकाठावर सुवासिनींनी गर्दी केली होती

गौराई च्या आगमनाने आनंदाने रिंगण करून गौराई गीते म्हणताना सुवासिनी

No comments:

Post a Comment