उपचाराअभावी पत्रकाराचा मृत्यू, जिवाला चटका लावणारी एक्झीट - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2020

उपचाराअभावी पत्रकाराचा मृत्यू, जिवाला चटका लावणारी एक्झीट

दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
      लातुर येथील पत्रकार गंगाधर सामवंशी यांचा मुत्यु म्हणजे खरच जिवाला चटका लावणारी गोष्ट होय. कोणत्याही ठिकाणी जिवाची पर्वा न करता निर्भिडपणे काम करणाऱ्या पत्रकाराचा मुत्यु पैशाअभावी उपचार न करता आल्याने मुत्यु झाला ही बाब खेदजनक आहे. सोशल मिडीयावरुण प्रसिद्ध झालेल्या ह्या पोष्टमुळे महाराष्ट्रातील सर्वच पत्रकारांच्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर भितीचे सावट देखिल पसरले आहे.
        सध्या सर्वत्र कोरोनाच्या महामारीमुळे खळबळ माजली आहे. सर्वच घटक आपल्या परीने कार्य करत आहेत. शासणाने कोरोना सबंधीत कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला सुरक्षतेसाठी वस्तु किंवा सहकार्य केले आहे. पण आज सर्वत्र मग महापुर असो किंवा कोराना किंवा आणखिण कोणतेही संकट असो अशावेळी योग्य माहिती सर्वसामान्याच्यांपर्यंत पोहचवणाऱ्या पत्रकारांकडे दुर्लक्ष केलेले दिसत आहे.कोरोना व महापुराच्या वेळी मदत करताना प्रसिध्दिसाठी पत्रकांराची आठवण येते का ? असा संतप्त सवाल पत्रकार वर्गातुन विचारला जात आहे.
            आज गंगाधर सोमवंशी सारखे कित्येक पत्रकार तुटपुंज्या मिळकतीवर कोरोनायोध्याचे कार्य प्रामाणिकपणे करत आहेत. कुंटुबाचा गाडा ओढत असताना येणाऱ्या अनंत अडचणींना तोंड देत आहेत. अडचणी आल्या म्हणुन कधी पत्रकारांनी रास्ता रोको केला नाही की जाळपोळ केली नाही. सामाजिक कार्याला वाहुण घेतलेल्या पत्रकारांनी फक्त आपल्या कार्याला महत्त्व दिले. पण सुजलाम सुफलाम असणाऱ्या ह्या महाराष्ट्रात आज एका पत्रकाराला उपचाराअभावी मुत्युला कवटाळावे लागते खरच हे योग्य आहे का ? खरच आदोंलण व जाळपोळ केल्यानंतरच मागण्या मान्य करायच्या असा शासणाचा नियम आहे का ? ज्या दिवशी पत्रकार लेखणी बंद आदोंलण करतील त्यावेळीच शासणाला जाग येणार का ? असे अनेक प्रश्न गंगाधर सोमवंशीच्या मुत्युने पत्रकांराच्या समोर उभा राहीलेत. सोमवंशीच्या मुत्युने समस्त पत्रकार बधुंणा धोक्याच्या इशारा दिल्याची घंटा म्हणता येईल. तेव्हा आता येथून पुढे अशा घटणा घडु नयेत समाजाचा चौथा खांब डळमळीत होऊ नये यासाठी शासणाला जागे करण्याची गरज आहे.
        पत्रकार गंगाधर सोमवंशी यांची उपचाराअभावी मुत्युची पोस्ट सोशल मिडीयावर वाचताच चंदगड तालुका पत्रकार संघाने कोरोनाच्या पार्श्वभूमिवर व्हॉटस् व्हिडीओ कॉलींगच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधुन सोमवंशी यांना श्रध्दाजंली वाहली.

No comments:

Post a Comment