पै. राम पवार |
चंदगड / प्रतिनिधी
मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील पैलवान व आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक यांची पैलवान ग्रुप महाराष्ट्र या संघटनेच्या राज्य तज्ञ प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष जागतिक पदक विजेतेपद पै.विलास देशमुख यानी राम पवार यांना नियुक्ती पत्र दिले. आजपर्यंत पै.पवार यानी क्रीडा, सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन पैलवान ग्रुप. महाराष्ट्र या आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करणा-या संघटनेच्या राज्य तज्ञ प्रशिक्षक या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. संघटनेस अभिप्रेत असलेली ध्येय धोरणे कुस्ती, क्रीडा व सामाजिक तसेच इतर कार्ये आपण निश्चित प्रामाणिकपणे पार पाडाल अशी अपेक्षा उपाध्यक्ष महाराष्ट्र चॅम्पियन राजकुमार खरात, कार्याध्यक्ष पै. अमोद काशिद यानी व्यक्त केली आहे. पै. राम पवार यानी भारतीय कुस्ती महासंघ, दिल्ली भारतीय कनिष्ठ कुस्ती संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्य केले. आता पर्यत बोस्निया, उझबेकिस्तान, क्रोएशिया, आर्जेंटिना, थायलंड, भारत येथे झालेल्या अनेक आशियाई कुस्ती स्पर्धा, जागतिक कुस्ती व युवा ऑलंपिक स्पर्धेमध्ये भारतीय पुरूष व महिला संघाला तसेच भारतीय सैन्य कुस्ती संघालाही प्रशिक्षण दिले आहे.

No comments:
Post a Comment