दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी भाजपचा हलकर्णी फाट्यावर रास्ता रोको - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2020

दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी भाजपचा हलकर्णी फाट्यावर रास्ता रोको

हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथे भाजपतर्फे दूध दर वाढ अंदोलन करण्यात आले. 
 चंदगड / प्रतिनिधी
 दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी हलकर्णी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .चंदगड तालुक्यात बेळगाव - वेंगुर्ला मार्गावर हलकर्णी फाटा येथे सकाळी ११ वा . रास्ता रोको रस्ता करण्यात आला . यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती . राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान आणि दूध पावडरसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळावे , अशी भारतीय जनता पार्टीची मागणी आहे . त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज ११ वा . बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर हलकर्णी फाटा येथे महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले . या वेळी ' दुधाला ३० रू . दर मिळालाच पाहिजे ..' निष्क्रिय राज्य सरकारचा धिक्कार असो .. ' अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या .आंदोलनावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता . या आंदोलनात भाजप जिल्हा उपाध्यक्ष शांताराम पाटील , तालुका उपाध्यक्ष संदीप नांदवडेकर , अनिल शिवणेकर , सचिन पिळणकर , चेतन बांदिवडेकर , प्रताप सूर्यवंशी , शामराव बेनके , रवी बांदिवडेकर , महेश पाटील , अशोक कदम , तानाजी पाटील , नितीन फाटक , कार्यकर्ते उपस्थित होते.
अडकूर (ता. चंदगड) येथेही दूध दरवाढ अंदोलन करण्यात आले.
       अडकूर येथे ही आंदोलन अडकूर येथेही आज सकाळी  दूधदर वाढ अंदोलन  करण्यात आले. माजी सभापती बबनराव देसाई, कृष्णा रेगडे यांच्या नेतृत्वाखाली दुध दरवाढ अदोलन करण्यात आले, अशोक गूरव,संदीप अर्दाळकर,गणपत अर्दाळकर, केशव इंगवले, बंडू देसाई, दत्ता रेंगडे,दत्ता भेकणे,वसंत चंदगडकर,पूष्पा गूरव,सूमन भेकणे आदी कार्यकर्ते या अंदोलनात सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment