मलगड येथील राजेंद्र विठ्ठल घोळसे यांचे अपघाती निधन - चंदगड लाईव्ह न्युज

18 August 2020

मलगड येथील राजेंद्र विठ्ठल घोळसे यांचे अपघाती निधन

राजेंद्र घोळसे
कोवाड / सी एल वृत्तसेवा

मलगड (ता. चंदगड) गावचे प्राथमिक शिक्षक संजय घोळसे यांचे लहान बंधू राजेंद्र विठ्ठल घोळसे यांचे १५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ रोजी अपघाती दुःखद निधन झाले.
     १५ ऑगस्ट रोजी गावातील मराठी शाळेतील ध्वजारोहन कार्यक्रमाला उपस्थिती लावून गावा शेजारील हाळयाकडील शेतात गुरांना वैरण आणण्यासाठी गेले होते. बराच वेळ घरी न आल्याने शोधाशोध केली असता शेतामध्ये ते पडलेल्या अवस्थेत आढळले. वैराणीचा भारा अंगावर पडल्याने छातीच्या बरगडया मोडून फुफूसामध्ये रक्तस्त्राव झाल्याने मृत्यु झाला असल्याचे चंदगड ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड यानी सांगितले.मनमिळावू आणि कष्टाळु असणाऱ्या राजेंद्र यांच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात आई, वडील भाऊ,पत्नी आणि दोन लहान मुलगे आहेत. पुढील तपास कोवाड पोलीस चौकीचे सहा.पोलिस निरीक्षक हणमंत नाईक करत आहेत.

No comments:

Post a Comment