कोवाड येथे 1266 कुटुंबीयांची होणार आरोग्य तपासणी, जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण यांच्या हस्ते अभियानास प्रारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

15 September 2020

कोवाड येथे 1266 कुटुंबीयांची होणार आरोग्य तपासणी, जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण यांच्या हस्ते अभियानास प्रारंभ

कोवाड : अभियानाअंतर्गत तपासणी करताना आरोग्य केंद्रातील कर्मचारी व नेमणूक केलेले कर्मचारी इ
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
        कोवाड (ता. चंदगड) येथे महाराष्ट्र शासनाचे 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या अभियानास जि प सदस्य कल्लाप्पा भोगण यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. तीन पथकाद्वारे कोवाड मधील 1266 कुटुंबीयांची आरोग्य तपासणी व त्यांची माहिती संकलित केली जाणार असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाड चे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रसन्न चौगुले  यांनी दिली.
अभियान उदघाटन प्रसंगी मान्यवर
        अभियान प्रारंभ प्रसंगी प्रशासक बी एम कांबळे ,सर्कल आपासो जिनराळे, तलाठी दीपक कांबळे, ग्राम विकास अधिकारी जी एल पाटील, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य बरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्राचे तसेच केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड चे कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्यसेविका यांनी अभियाना बद्दल माहिती दिली.आशा सेविका सुनीता पाटील ,नंदिनी पाटील,शीतल जाधव, अंगणवाडी सेविका रमेजा मुल्ला,गीता कुंभार,रोहिणी बुरुड यांच्या बरोबर केंदीय प्राथमिक शाळा मधील शिक्षिका कविता पाटील,भावना आतवाडकर,गावस,अनंत भोगण यांचा समावेश असलेली एकूण तीन आरोग्य तपासणी पथके तयार केली आहेत.
           या पथकाद्वारे कोवाड गावातील 1266 कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे तापमान, पल्स रेट, ऑक्सिजन लेव्हल तसेच अन्य काही आजार आहे का, याची तपासणी होणार असून तशी नोंद करून आरोग्य खात्याकडे अहवाल देण्यात येणार आहे.  दिनांक 15  ते दिनांक 10 ऑक्टोबर या दरम्यान पहिला टप्पा तर  दिनांक 10 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर पर्यंत दुसरा  दुसऱ्या टप्प्यात तपासणी होणार आहे.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रसन्न चौगुले,औषध निर्माता भरत पाटील,प्रयोग शाळा तंत्रज्ञ नरेंद्र रजपूत,आरोग्य सहायक नारायण घोडे,गजानन चव्हाण,शैलेश वाघमारे,सावखान,आरोग्य सहायिका रंजना साळोखे, अमरावती गावित,परिचर सुनील गायकवाड,हनुमंत लेंभे,आरोग्य सेविका सुरेखा पाटील,संजीवनी पाटील,आशा वर्कर सुनीता पाटील,नंदिनी पाटील आणि शीतल जाधव,केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment