कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याने ते पुन्हा मिळवण्यासाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. यापूर्वी आंदोलन व मोर्च्यात आपल्या तालुक्यातील मराठा समाजाबरोबरच इतर समाजातील लोकांनी भाग घेतला होता. सरकारने आरक्षण संदर्भात कायदा केला . पण सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. हा घोर अन्याय आहे. याबाबत विचारविनिमय करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बुधवार दि.१६ रोजी दुपारी ठीक १२ वाजता मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडी ता. येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी मराठा समाजातील सर्व घटकांनी उपस्थित राहावे. बैठकीमध्ये सामाजिक अंतर ठेवावे आणि मास्कचा वापर करण्यात यावा असे आवाहन मराठा मोर्चा च्या वतीने प्रा. दीपक पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment