सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ३६ : विषारी विरुद्ध बिनविषारी साप - चंदगड लाईव्ह न्युज

16 September 2020

सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ३६ : विषारी विरुद्ध बिनविषारी साप

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ३६ :  विषारी विरुद्ध बिनविषारी साप
                            मांजऱ्या       VS        फुरसे
      मांजऱ्या (Common cat snake) VS फुरसे (Saw Scaled Viper)
विषारी आणि बिनविषारी साप लगेच ओळखता न आल्यामुळे विषारी साप समजून बिनविषारी सापांची नेहमी हत्या होते. बहुतांशी वेळेला साप मारल्यानंतर समजते की हा बिनविषारी साप होता. अशा सापांची आणखी एक जोडी म्हणजे विषारी फुरसे विरुद्ध दुर्मीळ बिनविषारी मांजऱ्या साप होय.
  दोन्ही सापांच्या अंगावरील नक्षी जवळपास सारखी (पण ओळखण्या इतपत फरक असतो.) शरीराची ठेवणही समान वाटत असली तरी मांजऱ्या (डोक्यावर इंग्रजी Y अक्षरा सारखी खूण  आणि डोळे मोठे) झाडाझुडुपांवर सराईतपणे वावरतो. फुरसे पुर्णपणे जमिनीवर वावरणारा साप आहे. दिसण्यातील सारखेपणा मुळे विषारी फुरसे साप समजून बिनविषारी व अतिदुर्मिळ मांजऱ्या सापाची नाहक हत्या होते. पर्यावरण साखळीतील महत्त्वाचा घटक असलेले असे दुर्मिळ जीव चाललेले  वाचले पाहिजे.यासाठी प्रत्येक नागरिकांने जागरूक असले पाहिजे.

(सापांच्या मालिकेतील भाग - ४ मध्ये फुरसे तर भाग - २६ मध्ये मांजऱ्या सापाबद्दल अधिक माहिती दिली आहे)

माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  

सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर



शब्दांकन / संपादन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२



No comments:

Post a Comment