सडेगुडवळे ग्रामस्थांकडून कोरोना निधीसाठी 5 हजारांची मदत - चंदगड लाईव्ह न्युज

15 September 2020

सडेगुडवळे ग्रामस्थांकडून कोरोना निधीसाठी 5 हजारांची मदत

चंदगड : तहसीलदार विनोद रणावरे यांच्याकडे धनादेश सुपूर्द करताना प्रकाश गावडे, शितल गावडे, सुनील झेंडे.
कागणी : सी. एल. सेवा
          सडेगुडवळे (ता. चंदगड) येथील कोरोना दक्षता कमिटी यांच्याकडून कोरोना प्रतिबंधासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे पाच हजार रुपयांचा धनादेश जमा केला. तहसीलदार विनोद रणावरे यांच्याकडे सदर धनादेश देण्यात आला. यावेळी कोरोना दक्षता कमिटीच्या अध्यक्षा व उपसरपंच प्रभावती गावडे, सामाजिक कार्यकर्ते सुनील झेंडे, कमिटीचे सचिव पोलीस पाटील शितल गावडे, तलाठी रूपाली कांबळे, ग्रामसेवक डी. डी. नाडेकर, लक्ष्मण फाटक, सुनीता गावडे, रामदास झेंडे, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष पुंडलिक गावडे, प्रकाश गावडे, पांडुरंग गावडे, बाबली झेंडे, संतोष माइनकर, मारुती कांबळे, लक्ष्मी गावडे, गीता माईनकर, अनिता गावडे आदी सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment