तृतीय वर्षाच्या विद्यापीठ परीक्षा होणार - चंदगड लाईव्ह न्युज

15 September 2020

तृतीय वर्षाच्या विद्यापीठ परीक्षा होणार

दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
         हलकर्णी (ता.चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात तृतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या व सेमिस्टर  तीन, चार, पाच मधील विषय राहिलेल्या व परीक्षेसाठी फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठाच्या दिनांक 11/09/2020 च्या परिपत्रकानुसार परीक्षा होणार आहेत. 
       सदरच्या परीक्षा 01 ऑक्टोबर, 2020 पासून होणार असून विद्यार्थ्यांनी त्वरित आपला व्हाट्सअप नंबर, ईमेल या सह महाविद्यालयाशी संपर्क साधावा. चंदगड, आजारा, गडहिंग्लज तालुक्यातील सर्वच विद्यार्थ्यांनी परीक्षे संदर्भात आपापल्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन हलकर्णी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. अनिल गवळी यांनी केले आहे. 


No comments:

Post a Comment