सडेगुडवळे येथे सामाजिक कार्यकर्ते सुनील झेंडे यांच्याकडून मास्क, अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

15 September 2020

सडेगुडवळे येथे सामाजिक कार्यकर्ते सुनील झेंडे यांच्याकडून मास्क, अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटपसडेगुडवळे : मास्क वाटप करताना पोलीस पाटील शितल गावडे. शेजारी सुनील झेंडे, पुंडलिक गावडे ग्रामसेवक डी. डी. नाडेकर आदी.
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
    सडेगुडवळे-फाटकवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते सुनील झेंडे यांनी स्वखर्चातून ग्रामस्थांना मास्क तसेच अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यांनी सर्व गावकऱ्यांना मदत केली. 
    सुनील झेंडे म्हणाले, कोरोनाला हरवायचे असेल तर सुरक्षा व आवश्यक खबरदारी घेणे हाच उपाय आहे. आगामी काळात ग्रामस्थांनी योग्य ती खबरदारी घेऊन संपूर्ण गाव सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.
    यावेळी स्नेहल सूनील झेंडे, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष पुंडलिक गावडे, पोलीस पाटील शितल गावडे, उपसरपंच प्रभावती गावडे, ग्रामसेवक दत्तात्रय नाडेकर यांच्यासह तानाजी झेंडे, सागर गावडे, जनार्दन पाटील, भिकाजी झेंडे, उत्तम गावडे, कृष्णा कांबळे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment