तुर्केवाडी गावामध्ये . 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियानाचा आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

15 September 2020

तुर्केवाडी गावामध्ये . 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियानाचा आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

कोरोनाला घाबरून, लाजून आणि लपवून चालणार नाही : आमदार राजेश  पाटील   
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथे 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना आमदार राजेश पाटील, तहसिलदार विनोद रणवरे व इतर. 
तुर्केवाडी (प्रतिनिधी) : 
         कोरोनाला घाबरून, लाजून आणि लपवून चालणार नाही आहे. त्याचे योग्य वेळी निदाण होणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण सर्वांनी स्वतःहून काळजी घेत आरोग्याचा सुचना पाळणे महत्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियानात सहभाग घेत आपलं कुटुंब, आपला गाव, आपला तालुका, आपला मतदारसंघ कसा सुरक्षित राहील या दृष्टीने प्रयत्न करुया अशी अपेक्षा यावेळी आमदार श्री. राजेश पाटील यांनी व्यक्त केली. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियानाची सुरवात चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी गावातून आज (मंगळवार दि. १५ सप्टेंबर) आमदार श्री. राजेश पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

        कोरोना महामारीत तुर्केवाडी गावाने वर्गणी काढून मास्क, सॅनिटायझर वाटप करत कोरोनाला रोखण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. असे असतांना देखिल या गावचं नाव हॉटस्पॉटच्या यादित नाव येणे हे आश्चर्यकारक आहे. तुर्केवाडी बाजारपेठेचे गाव असून बँक ऑफ महाराष्ट्र सारखी शाखा असल्याने आजुबाजूच्या दहा गावातील लोक येथे येत असतात. अशा परिस्थितीतही या ग्रामपंचायतीने दक्षता घेतली हे कौतुकास्पद आहे. अशीच कामगिरी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियानातूनही केली जाईल अशी अपेक्षा आमदार श्री. राजेश पाटील यांनी व्यक्त केली.

        यावेळी माजी सभापती व प. स. सदस्या मुरकुटे मॅडम, तहसीलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, सरपंच रुद्राप्पा तेली, उपसरपंच अरुण पवार, पोलिस पाटील सौ. माधुरी कांबळे, तलाठी सौ. नांगरे मॅडम, ग्रामसेवक अशोक पाटील, ज्येष्ठ सदस्य गोपाळराव औऊळकर, बी.डी. पाटील, जोतिबा गावडे, तालुक संघ संचालक बाळू चौगुले, सेवा सोसायटी चेअरमन लक्ष्मण खोत, शंकर औऊळकर, भरमाण्णा अडकुरकर, सुतार, फातिमा शेख, तानाजी चौगुले व इतर ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व ग्रामस्त उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एम. के. पाटील यांनी केले. तर आभार सरपंच रुद्राप्पा तेली यांनी व्यक्त केले.

       यावेळी आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांना कोरोनासंदर्भात या अभियानाअंतर्गत थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटर व इतर तपासण्यांचे प्रात्यक्षिक दाकवण्यात आले. तसेच गावकऱ्यांना अभियानाअंतर्गत शपथ देम्यात आली. 

        - तीनही तालुक्यात मिळून १८० आरोग्य सेवकांची आवश्यकता 
        यावेळी आमदार श्री. पाटील म्हणाले की, आज या ग्रामीण भागातील आरोग्याची परिस्थिती दयनिय आहे. त्या अनुषंगाने चंदगड मतदारसंघात आरोग्य व्यवस्थेसाठी राज्य स्तरावर पाठपुरावा करत असून आरोग्य राज्य मंत्र्यांना मतदारासंघातील परिस्थिती समजावी यासाठी त्यांच्या हस्ते अॅम्ब्युलन्सचे लोकार्पनानिमित्त त्यांना आमंत्रित केले होते. सध्या चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यात डॉक्टर्सपासून नर्सपर्यंत साधारण १८० आरोग्य सेवकांची कमतरता आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांकडेही निवेदन दिले असून त्याचा पाठपुरवठा सुरु आहे. 
         तसेच तुर्केवाडी गावाने ज्या पद्धतीने स्वयंशिस्थिने आतापर्यंत काम केलं आहे. त्याचपद्धतीने या अभियानातही नागरिकांनी सहकार्य करुन आपली जबाबदारी समजून माझं कुटुंबच नाही तर माझं गाव माणून सहभागी व्हावं. आरोग्य सेविकांना नागरिकांनी सहकार्य करा, त्यांना संपूर्णा कुटुंबाची योग्य ती माहिती द्यावी. प्रत्येक सदस्यांची तपासणी होण्याची आवश्यकता आहे. त्यातून जोखमीच्या लोकांना उपचार मिळणे आवश्यक आहे. आपण स्वतःहून न घाबरता काळजी घेतली तर कोरोनापासून बचाव होवू शकतो असेही आम. पाटील यांनी नमुद केले.

        - आमदारांच्या पुढाकाराने तुर्केवाडी ग्रामीण रुग्णालयाला गती
बहुप्रतिक्षित तुर्केवाडी गावातील ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला येत्या डिसेंबर महिन्यात सुरवात होत आहे. हे काम गेले अनेक वर्षे प्रलंबित होते. शासकीय स्तरावर काही तांत्रिक अडचणी येत होत्या. दरम्यान, आमदार श्री. राजेश पाटील यांच्या पुढाकाराने या सर्व समस्या सोडवल्या जावून या रुग्णालयाच्या कामाला गती मिळाली आहे. तरी तुर्केवाडी पंचक्रोशीतील आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या या रुग्णालयाचे काम लवकरच सुरु होणार असून त्याबद्दल तुर्केवाडी गावच्या वतीने आमदार श्री. पाटील यांचे गोपाळराव औऊळकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment