पुणे / प्रतिनिधी
टीव्ही-9 व्यवस्थापनाने पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना किमान दहा लाख रूपयांची मदत करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने टीव्ही-9 चे सीईओ बरूण दास आणि मुख्य संपादक उमेश कुमावत यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
पांडुरंग रायकर हे टीव्ही-9 चे पुण्यातील पूर्णवेळ प्रतिनिधी होते.कामावर असतानाच त्यांना केव्हा तरी कोरोनाची बाधा झाली.त्यानंतर त्यांच्यावर योग्य ते उपचार झाले नाही ,त्यांना ऑक्सीजन मिळाले नाही,अॅब्युलन्स मिळाली नाही परिणामतः एक तरूण आणि उमदा पत्रकार सर्वांना सोडून गेला.रायकर यांच्या निधनाने कोरोना उपचाराबाबतची दुरावस्था जगासमोर आली आहेच.केवळ योग्य उपचार न झाल्याने रायकर याचं निधन झालेलं असल्यानं सरकारनं जाहीर केल्याप्रमाणे 50 लाखांची मदत त्यांच्या कुटुंबियांना द्यावी अशी महाराष्ट्रातील पत्रकारांची मागणी आहे आणि त्यासाठी नांदेड,बीड आणि अन्य जिल्हयात आंदोलनं देखील झाली आहेत.
सरकारकडे पत्रकारांचा पाठपुरावा सुरूच असला तरी रायकर ज्या संस्थेसाठी, टीव्ही-9 साठी काम करीत होते त्यांनी देखील उघडयावर पडलेल्या रायकर कुटुबियांना किमान दहा लाखांची आर्थिक मदत देऊन आधार द्यावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेच्यावतीन टीव्ही 9 चे सीइओ श्री.बरूण दास आणि मुख्य संपादक उमेश कुमावत यांच्याकडे केली आहे..रायकर कुटुंबियांना टीव्ही-9 ने वाऱयावर सोडू नये,अशी विनंती व्यवस्थापनाला पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे.42 वर्षाचा तरूण पत्रकार गेल्याने रायकर कुटुंबिय उघडयावर पडले आहे.पांडुरंग हा त्यांच्या आई-वडिलांचा एकमेव आधार होता.मात्र हा आधारच तुटल्याने वृध्द आई-वडिल आणि पत्नी ,छोटं मुल सारेच निराधार झाले आहे.पांडुरंगच्या कुटुंबियांचा कायदेशीर हक्क आणि संस्थेची जबाबदारी आणि माणुसकीच्या नात्याने टीव्ही 9 ने तात्काळ रायकर कुटुंबियांना मदत करावी अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. या पत्रावर एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी आदिंच्या स्वाक्षर्या आहेत.
No comments:
Post a Comment