घरफोडी करून साडे अकरा लाखाची चोरी करणारा तालुक्यातील एकजण पोलिसांच्या जाळ्यात - चंदगड लाईव्ह न्युज

01 September 2020

घरफोडी करून साडे अकरा लाखाची चोरी करणारा तालुक्यातील एकजण पोलिसांच्या जाळ्यात

स्थानिक गुन्हे अन्वेशन पोलिसांकडून केवळ पाचच दिवसात गुन्ह्याचा छडा
संदेश फडके याने चोरलेला माल. 
चंदगड / प्रतिनिधी
         बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ११ लाख ३४ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरणार्या संदेश रविंद फडके (वय वर्षे  २०, रा. माणगाव, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) याला ३० ऑगस्ट रोजी नेसरी बसस्टॉप येथून सापळा रचून अटक केली. त्याला चंदगड न्यायालयात हजर केले असता ४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. घरफोडीची घटना माणगाव येथे ७ ऑगस्टला घडली होती.
संशयित आरोपी संदेश फडके
       मिळालेल्या माहितीनुसार, गुन्ह्या घडल्यापासून पोलिस गावात व चंदगड भागात माहिती घेत होते. दरम्यान, फिर्यादीने संदेश रविंद्र फडके  या व्यक्तीवर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर त्या व्यक्तीवर  पाळत ठेवून त्याची माहिती घेवून तपास करीत असताना ३० ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. संदेश फडके हा चोरीतील गुन्हयातील चोरलेला माल घेवुन नेसरी बसस्टैंडसमोर विक्री करणेकरीता येणार आहे. त्यानुसार नेसरी येथे सापळा रचून सायंकाळच्या वेळेस पकडले. त्यानुसार आरोपीकडे गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालापैकी सोन्याचा पोहे हार एक, नेकलेस एक, बारशाच्या तहान अंगठया ७ नग, मोठी अंगठी एक नग, कुड्या व झुबे एक जोड, मोठ्या रिंगा २ जोड, लहान रिंगा २ जोड, कुड्या व कानवेल एक जोड, ओम आकाराचे लॉकेट एक असे ५० ग्रॅम सोन्याचे दागीने, चांदीचे दागीने त्यात मोठे पैंजण जोड, लहान मुलीचे पैंजण जोड, बिंदल्या जोड, तोडे जोड, गजे, काजु बिया, वाळे असे एकूण ५५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने व रोख रक्कम ५ लाख रुपये असा एकूण ८ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. सदर मुद्देमाल जप्त करुन घरफोडीचा गुन्हा केवळ पाचच दिवसात उघड केला.
       या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी स्वतः लक्ष घालून करण्याबाबात मा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देखमुख यांनी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी स्था. गु. शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक सत्यराज पुले, पो.हे.कॉ. नरसिंग कांबळे, शिवाजी पडवळ, शिवाजी सोराटे, प्रल्हाद देसाई, सचिन देसाई, संजय पडवळ अशांचे तपास पथक तयार करुन केवळ पाचच दिवसात गुन्हा उघडकीस आणला. तर पुढील तपास चंदगड पोलिसा ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक सातपुते करीत आहेत.
           सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक तिरपती तातडे यांचे मार्दर्शनाखाली स्थनिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.तानाजी सावंत, सहा पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पोलीस कर्मचारी नरसिंग कांबळे, शिवाजी पडवळ, शिवाजी खोराटे, प्रल्हाद देसाई. सचिन देसाई, संजय पडवळ, संजय चाचा, रणजित कांबळे, सुरेश पवार यांनी केलेली आहे.


1)आरोपी संदेश रविंद फडके
2)आरोपी 

No comments:

Post a Comment