आमदार राजेश पाटील यांच्या सूचनेनंतर बांधकाम विभागाने शिरोली -सत्तेवाडी येथील बदललेले पाईप |
तेऊरवाडी -सी .एल. वृत्तसेवा
हलकासा पाऊस पडला तरी सतत पाण्याखाली जाणाऱ्या शिरोली -सत्तेवाडी (ता. चंदगड) दरम्यान असणाऱ्या मोरीचे पाईप बांधकाम विभागाने तात्काळ बदलले .आमदार राजेश पाटील यांच्या सूचनेची तात्काळ दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतल्याने प्रवाशी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
कानूर -गवसे-इब्राहीमपूर- अडकूर प्रजीमा वरील किमी १२ / ६०० या ठिकाणी रस्त्यावर असणाऱ्या मोरोखाली खूपच लहान पाईप होते . त्यामूळे हलका पाऊस पडला तरी येथील रस्त्यावर लगेच पाणी येऊन रस्ता वाहतूकीसाठी बंद पडायचा . येथे मोठे पाईप बसवण्यासंदर्भात ग्रामस्थानी बांधकाम विभागाकडे मागणी केली होती .आमदार राजेश पाटील यानी बांधकाम विभागाला तात्काळ सूचना दिल्याने येथे मोठे पाईप टाकण्यात आले . त्यामूळे प्रवासी व ग्रामस्थाकडून समाधान व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment