सोमनाथ गवस |
चंदगड (प्रतिनिधी)
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्यावतीने शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल दिला जाणारा 'आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार २०२०' कोल्हापूर जिल्ह्यातून चंदगड येथील सोमनाथ पांडुरंग गवस (सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक) यांना नुकताच प्रदान करण्यात आला. गवस यांनी गर्भलिंग निवड प्रतिबंध कायदा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, ज्येष्ठ नागरिक संरक्षण अधिनियम प्रभावी अंमलबजावणी तसेच जेष्ठ नागरिकांच्या उन्नतीसाठी केलेल्या उत्तुंग व प्रभावी सामाजिक कार्याची दखल संस्थेने पुरस्काराच्या निमित्ताने घेत पदक, सन्मानपत्र व गौरव चिन्ह देऊन सन्मानित केले.
मुंबई येथे नुकत्याच झालेल्या ऑनलाइन गुणगौरव महासम्मेलन २०२० मध्ये संस्थापक अॅड कृष्णाजी जगदाळे, ह.भ.प. शामसुंदर सोन्नर, ज्येष्ठ साहित्यिक रमेश आव्हाड, समाजसेवक अशोकानंद जवळगावकर, डॉ. शुभदा जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. निवडीबद्दल सोमनाथ गवस यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

1 comment:
मा . गवस साहेब कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्धल हार्दिक हार्दिक अभिनंदन व भाविल वाटचालीस शुभेच्छा .
शुभेच्छुक - मारूती कुंभार व परिवार
Post a Comment