नेसरी येथे आठवडाभर लॉकडाऊन - चंदगड लाईव्ह न्युज

04 September 2020

नेसरी येथे आठवडाभर लॉकडाऊन

तेऊरवाडी -सी .एल. वृत्तसेवा
         ग्रामपंचायत नेसरी  (ता . गडहिंग्लज)  व व्यापारी संघटना यांचेकडून संपूर्ण नेसरी गाव आठवडाभर लॉक डाऊन राहणार आहे.  शनिवार दि. ०५ सप्टेंबर ते शनिवार दि.१२ संप्टेंबर२०२० पर्यंत नेसरी पूर्ण पणे बंद ठेवण्यात येणार आहे.
     या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा-दुध,मेडिकल,दवाखाना,पेट्रोल पंप,गिरण या सेवा वगळता अन्य सर्व सेवा बंद राहतील यांची सर्व नागरिकानी नोंद घ्यावी. शनिवार पासून नेसरी मध्ये जनता कर्फ्यू लागू असल्यामुळे खालील नियम व अटींचा उलंघन केलेल्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाही करण्यात येणार आहे. 
१) बाहेर गावातून नेसरी गावामध्ये येणाऱ्या व्यक्तीने आपल्या ग्रामपंचायत कडील परवाना पत्र घेतल्याशिवाय नेसरी गावामध्ये प्रवेश करू नये.
२) नेसरी मधील नागरिकांनी बाहेर कोणत्याही गावी जाणार नाहीत व बाहेरील कोणतीही व्यक्ती आपल्या घरी येणार नाही याची नोंद घ्यावी.
३) नेसरी मधील व्यापारी बाहेर गावी जाऊन मालाची विक्री करणार नाहीत याची दखल घ्यावी.
४) नेसरीतील सर्व व्यापाऱ्यांना एक सूचना आहे बंद काळात दुकान उघडून किवा घरातून माल विकू नये जे व्यापारी माल विक्री करेल त्याच्यावर दंडात्मक ५०००/ रु. दंड आकारण्यात येईल.
५) विनाकारण जि व्यक्ती बाजारात किवा अन्य  कोणत्याही परिसरात फिरताना आढळून आल्यास त्याच्यावर पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत यांचेकडून कायदेशीर कारवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
६) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखता हे नियम व अटी लागू केले आहे तरी सर्वांनी आपल्या घरी रहा सुरक्षित रहण्याचे आवाहन कोरोना दक्षता समिती नेसरी ता.गडहिंग्लज यांचेकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment