चंदगड नगरपंचायतीमध्ये तिसरा डोळा सज्ज - चंदगड लाईव्ह न्युज

15 September 2020

चंदगड नगरपंचायतीमध्ये तिसरा डोळा सज्ज

चंदगड नगरपंचायतीमध्ये सीसीटीव्हीच्या शुभारंभ प्रसंगी नगराध्यक्षा प्राची काणेकर,नेत्रदीपा कांबळे, मुंताजबी मदार, अभिजित गुरबे, रोहित वंटगी,फिरोज मुल्ला, ॲड. विजय कडुकर,प्रशासक अधिकारी सचिन शिंदे, अनिता परीट, अनुसया दाणी,माधुरी कुंभार
चंदगड / प्रतिनिधी 
         चंदगड नगरपंचायतीमध्ये पहिल्यांदाच तिसरा डोळा सज्ज झाला आहे. म्हणजे सी.सी.टीव्ही कॅमेराच्या माध्यमातून चंदगड नगरपंचायत मध्ये दाखल होणाऱ्यावर नजर असणार आहे. या सी.सी.टीव्ही कॅमेराचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. प्राची कानेकर यांच्या हस्ते व उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला यांच्या हस्ते संगणक संच याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चंदगड नगरपंचायत कार्यालयांमध्ये नगरसेवक श्रीमती मुमताजबी मदार, सौ. नेत्रदीपा कांबळे, सौ. अनुसया दाणी, सौ. माधुरी कुंभार, सौ. अनिता परीट, बांधकाम सभापती अभिजीत गुरबे, रोहित वाटंगी, ॲड. विजय कडुकर, मेहताब नाईक व या कार्यक्रमावेळी चंदगड ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. गरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी सचिन शिंदे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment