वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ३५ : विषारी विरुद्ध बिनविषारी साप - चंदगड लाईव्ह न्युज

15 September 2020

वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ३५ : विषारी विरुद्ध बिनविषारी साप

सी. एल. न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेलच्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ३५ :  विषारी विरुद्ध बिनविषारी साप

                                     अजगर VS घोणस
         विषारी आणि बिनविषारी साप लगेच ओळखता न आल्यामुळे विषारी साप समजून बिनविषारी सापांची नेहमी हत्या होते. बहुतांशी वेळेला सापाला मारल्यानंतर समजते की हा बिनविषारी साप होता. अशा सापांची दुसरी जोडी म्हणजे विषारी घोणस विरुद्ध बिनविषारी अजगर. 
         अजगर हा घोणस पेक्षा आकाराने बराच मोठा असतो. तथापि छोट्या आकाराचा अजगर आणि पूर्ण वाढ झालेला जहाल विषारी घोणस सकृतदर्शनी त्यांच्या अंगावरील डिझाईन मुळे सारखेच दिसतात. पण बारकाईने निरीक्षण केल्यास त्यांच्या अंगावरील नक्षी पूर्णपणे वेगळी असल्याचे दिसून येते. तरीही बऱ्याच वेळा डेंजर घोणस समजून अजगराची हत्या केली जाते. विश्रांतीसाठी बसलेले असताना दोन्ही साप शक्यतो शरीराचे पूर्ण वेटोळे करून बसतात अशावेळी कोणता साप आहे ते लगेच समजत नाही. तथापि पर्यावरण साखळीतील महत्त्वाचा घटक असल्यामुळे दुर्मिळ होत चाललेले अजगर वाचले पाहिजे हे मात्र नक्की.
 (दोन्ही सापांची स्वतंत्र माहिती यापूर्वीच्या भागांमध्ये सविस्तर दिलेली आहे)

माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  

सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर


शब्दांकन / संपादन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२

No comments:

Post a Comment