सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ३७ : विषारी विरुद्ध बिनविषारी साप
चापडी/चापडा VS गवत्या, हरणटोळ |
विषारी- चापडा /चापडी (हिरवी घोणस) (bamboo pit viper) VS बिनविषारी- गवत्या (green keel back), हरणटोळ (green Vine snake)
विषारी आणि बिनविषारी साप लगेच ओळखता न आल्यामुळे विषारी साप समजून बिनविषारी सापांची नेहमी हत्या होते. बहुतांशी वेळेला साप मारल्यानंतर समजते की हा बिनविषारी आणि दुर्मीळ साप होता. अशा सापांची आणखी एक जोडी म्हणजे विषारी हिरवा चापडा/चापडी विरुद्ध बिनविषारी गवत्या आणि हरणटोळ किंवा सर्पटोळ साप होय.
तिन्ही सापांचा रंग हिरवा असतो हिरव्या रंगावर काहीवेळा नक्षी असते. सर्वांच्या शारीरिक ठेवण मध्ये बरेच साम्य आढळते (हरणटोळ ची लांबी जास्त असते.) त्याचबरोबर ते झाडाझुडपांवर सराईतपणे वावरणारे आहेत. मात्र तिन्ही सापांच्या तोंड किंवा डोक्याच्या आकारावरून ते सहजपणे ओळखता येतात.
चापडा साप चावल्यास बाधित व्यक्तीस घोणस प्रमाणे लक्षणे दिसतात. तो अंडी न घालता घोणस प्रमाणेच पिल्लांना जन्म देतो.
साप ओळखण्यात गल्लत होऊन बहुतेक वेळा बिनविषारी साप समजून विषारी सापाला बेसावधपणे पकडले जाऊ शकते. अशावेळी दंश झाल्यास नाहक त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सापाला ओळखणे नितांत गरजेचे आहे.
(प्रस्तुत सापांच्या मालिकेतील भाग - ५ मध्ये चापडी तर भाग - १४ गवत्या आणि भाग - २० मध्ये हरणटोळ किंवा सर्पटोळ सापाबद्दल अधिक माहिती दिली आहे.)
2 comments:
नमस्कार. मला पण सर्पमित्र बनायचे आहे. काय करावे. .??
अधिक माहीतीसाठी श्रीकांत पाटील यांच्याशी 9423270222 या नंबरवर संपर्क करावा.
Post a Comment