किणी येथे परिवर्तन कडून वॅपोराईझर मशिनचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

18 September 2020

किणी येथे परिवर्तन कडून वॅपोराईझर मशिनचे वाटप

                  किणी येथे वॅपोराइझर चे वाटप करताना ए .एस. सावळगी, प्रविण गणाचारी व इतर. 

तेऊरवाडी - सी .एल. वृत्तसेवा       

       किणी येथील परिवर्तन सामाजिक बहुउद्देशीय संस्थेकडून  आशा स्वयंसेविका, मदतनीस  व ग्रामपंचायत कर्मचारी अशा सात जनांना गरम पाण्याची वाफ घेण्यासाठी वॅपोराईझर मशिन चे मोफत वाटप ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी ए. एस. सावळगी यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रविण गणाचारी, ग्रामसेवक बाळासाहेब खवरे, पो.पाटील रणजित गणाचारी, सामाजिक कार्यकर्ते संदिप बिर्जे, रंगा नांदुडकर, संदिप गणाचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment