अडकूर केंद्रात माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

18 September 2020

अडकूर केंद्रात माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेचा शुभारंभ

अडकूर येथे माझे कुटुंब - माझी जबाबदारी मोहिमेचा शुभारंभ करताना मान्यवर

तेऊरवाडी - सी . एल . वृत्तसेवा

     महाराष्ट्र शासनाने आखलेल्या माझे कुटुंब - माझी जबाबदारी या मोहिमेचा अडकूर (ता. चंदगड) या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ग्रामपंचायती समोर शुभारंभ करण्यात आला.

       यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉं .बी. डी . सोमजाळ म्हणाले, प्रत्येकाच्या आरोग्याची तपासणी शासनाच्या या मोहिमेतून होणार आहे. अडकूर केंद्रामधे ३० टिम दि १५ सप्टेंबर ते १० आक्टोबर पर्यंत २ २५००० हजार लोकांचा सर्वे करणार आहेत. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा या घटकांची मदत घेण्यात आली आहे. यामध्ये ही पथके घरोघरी जाऊन प्रत्येकाचे ऑक्सीजन व ताप यांची तपासणी करून कोविड-१९ ची लक्षणे असणाऱ्या लोकांना पुढील तपासणीसाठी चंदगड कोविड सेंटरला  पाठविणार आहेत . तसेच दमा ,क्षयरोग व इतर व्याधी असणाऱ्या लोकानी तपासणी पथकास सहकार्य करण्याचे आवाहन डाॅ . सोमजाळ यानी केले . यावेळी जि.प. सदस्य सचिन बल्लाळ, प. स. सदस्य बबनराव देसाई, सरपंच यशोधा कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य,  आशा व आंगणवाडी सेवीका, ग्रामसेवक सोनार व ग्रामस्थ उपास्थित होते.

No comments:

Post a Comment