भाजपचे चंदगड तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन मुगेरी यांना बंधूशोक - चंदगड लाईव्ह न्युज

18 September 2020

भाजपचे चंदगड तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन मुगेरी यांना बंधूशोक

विश्वनाथ घटग्याप्पा मुगेरी
कागणी : सी. एल. वृत्तसेवा

राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील रहिवासी व राजीव गांधी पतसंस्था शाखा राजगोळीचे माजी चेअरमन विश्वनाथ घटग्याप्पा मुगेरी (वय ५७) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन भाऊ असा परिवार आहे. गावातील सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार होता. तसेच गावातील गणेश मंदिर उभारण्यात त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली होती. अभियंता अरुण  मुगेरी यांचे ते वडील तर राजगोळी खुर्दच्या माजी सरपंच वृशाली संजय जनवाडे यांचे ते काका होते. दौलत साखर कारखान्याचे माजी संचालक, भाजपचे तालुकाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन मुगेरी व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त कॅशियर महेश मुगेरी यांचे ते भाऊ होते. रक्षाविसर्जन रविवार दि. 20 रोजी होणार आहे.
No comments:

Post a Comment