आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत शासनाने मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरावे, ढोलगरवाडी येथे झालेल्या बैठकीत मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2020

आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत शासनाने मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरावे, ढोलगरवाडी येथे झालेल्या बैठकीत मागणी

चंदगड / प्रतिनिधी 

    शैक्षणिक प्रवेशाबाबत आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत शासनाने मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरावे, सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करून आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशा मागण्या आज  ढोलगरवाडी (ता. चंदगड)  येथे सुरभी काजू  कारखान्यात मराठा आरक्षण प्रश्नी  बैठक पार पडली. त्यावेळी करण्यात आली. 

      प्रारंभी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून बैठकीला सुरवात झाली. यावेळी'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देण्यात आल्या   यावेळी सर्व पक्षीय बैठकीत मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणासाठी सर्वतोपरी लढा उभा करू असा ठाम निर्धार करण्यात आला.शैक्षणिक प्रवेशाबाबत आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत शासनाने मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरावे, सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करून आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी ॲड. संतोष मळविकर, प्रताप उर्फ पिनु पाटील, प्रा.दीपक पाटील, नारायण गडकरी, राजू पाटील, विलास कागणकर, संदिप नांदवडेकर, संदिप बिर्जे, अभिजित जोशिलकर, सुनिल बिर्जे, रणजित गावडे, अनिल गावडे, संजय कुट्रे, प्रताप उजळे, राज सुभेदार, गणपती तुळसकर, अरुण पाटील, सुरज यादव, अभिजित देवण, संकेत गावडे, धैर्यशिल यादव इत्यादी मान्यवरांनी आरक्षणा संदर्भात पुढील वाटचालीबाबत सविस्तर चर्चा केली. 

तत्कालीन  शासनाने शिक्षण आणि नोकरीत दिलेल्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याबाबत आजच्या बैठकीत विचारविनिमय करून आज १८ सप्टेंबर 2020 रोजी दुपारी १२ वाजता चंदगड तहसिलदार यांना सकल मराठा समाजाच्या वतीने मागण्यांचे निवेदन हालगीच्या निनादात देण्यात येणार आहे. यावेळी सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:

Post a Comment