रविकिरण पेपर मिलच्या कामगारांचे अकराव्या दिवशीही अंदोलन सूरूच, कामगारांचे आमदार, तहसिलदार यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2020

रविकिरण पेपर मिलच्या कामगारांचे अकराव्या दिवशीही अंदोलन सूरूच, कामगारांचे आमदार, तहसिलदार यांना निवेदन

हलकर्णी ता.चंदगड  येथील औद्योगिक वसाहतीतील पेपर मिल समोर आंदोलन करताना कामगार.

चंदगड / प्रतिनिधी 

हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहत मधील रविकिरण पेपर मिल समोर कामगारांनी बेमुदत आंदोलन सुरू करून अकरा दिवस झाले तरी कंपनीचे व्यवस्थापन याची विचारपूस सुद्धा करायला तयार नसल्याने चित्र दिसत आहे.त्यामुळे कामगारांनी आज आमदार राजेश पाटील यांना भेटून आपल्या अडचणी मांडल्या. आपण यात लक्ष घालावे अशी विनंती करून निवेदन दिले आहे.त्याचबरोबर चंदगडचे तहसिलदार विनोद रणविरे यांनाही निवेदन दिले आहे.सन २०१५-१६ पासूनचा महागाई भत्ता ताबडतोब जमा करा,लोकडाऊन मधील पीएफ आणि इएसआयचे पैसे ताबडतोब जमा करा. कंपनी कामगारांचे पगार पत्रक व नियुक्ती पत्रक ताबडतोब द्या अशा विविध मागण्यांसाठी कामगारांनी दि.८ सप्टेंबरपासून ऊन,वारा, पाऊसमध्येही  कामगारांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे .जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत आम्ही गेट समोरून हलणार नाही अशा कडक शब्दात  कामगार संघटनेचे अध्यक्ष जोतिबा जोशीलकर यांनी पेपर मिलच्या अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.त्यावेळी सर्व कामगार एकजुटीने आंदोलनात सहभागी होते. कंपनी व कामगार यांच्यातील संपाविषयी  प्रशासनाने भाग घेऊन तोडगा  काढावा  अन्यथा कामगारांच्या जीवनावर परिणाम होईल. यावेळी कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी,कामगार उपस्थित होते.

                                   

No comments:

Post a Comment