चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाचे प्रवेशाबाबत आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2020

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाचे प्रवेशाबाबत आवाहन

चंदगड / प्रतिनिधी 

चंदगड येथील  र. भा. माडखोलकर महाविद्यालयात  बी. ए. / बी. कॉम. / बी. एस्सी. भाग –१ या शाखेत प्रवेश घेवून प्रवेशासाठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज सादर केलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश फि भरून महाविद्यालयात प्रवेश घ्यावा. प्रवेशीत विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडून पात्रता पडताळणी करून घेण्याची मुदत संपण्यापूर्वी प्रवेश घेणे आवश्यक असते. वेळेत प्रवेश न घेतल्यामुळे वर्ष वाया गेल्यास महाविद्यालय जबाबदार राहणार नाही. याची सर्व संबंधीत विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्राचार्य डाॅ. पी. आर. पाटील यांनी केले आहे.
No comments:

Post a Comment