"माज काय व्हताय" म्हणत नागरीक घराबाहेर, बेफिकीरीमुळे तालुक्यात रुग्णसंख्या वाढतीच, प्रशासनावर ताण - चंदगड लाईव्ह न्युज

28 September 2020

"माज काय व्हताय" म्हणत नागरीक घराबाहेर, बेफिकीरीमुळे तालुक्यात रुग्णसंख्या वाढतीच, प्रशासनावर ताण


दौलत हलकर्णी (संतोष सुतार), सी. एल. वृत्तसेवा

          "माज काय व्हताय" म्हणत चंदगडचे नागरीक विनाकारण घराबाहेर पडून फिरताना दिसत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा आढावा घेतल्यास सध्या रोज तालुक्यात पधंरा ते विसच्या सख्येंने रुग्णांची वाढताना दिसत आहे. त्यामुळे चंदगड कोविड सेंटरमध्ये गर्दी होत आहे. प्रशासणाचे नियम धाब्यावर बसवत ' माज काय व्हताय ' असेच सर्वत्र ऐकावयास मिळत आहे.

          माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासणाच्या योजणे बद्दल नागरीक कितपत खबरदारी घेतात यावरच कोरानाचा ससंर्ग रोखण्यास मदत होणार आहे. सध्या तालुक्यातील महत्त्वाच्या बाजारपेठा बघीतल्यातर सर्वत्र गर्दीचा उच्चांक मोडल्याचे दिसते. प्रत्येक गावात विनामास्क फिरु नये, तसेच प्रत्येक व्यापाऱ्यांने आपल्या दुकानाच्या समोर नो मास्क नो एन्ट्रीचे डिजीटल फलक लावले आहेत.व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात जास्त गर्दी न करता सोशल डिस्टणचे पालन कडक करण सबंधी ग्रामपचांयत प्रशासणाकडुन सुचना देण्यात आल्या आहेत. प्रशासण जरी सूचना देत असले तरी व्यापारी वर्ग तसेच नागरीकांच्याकडून या सूचनांचे पालन होणे गरजेचे आहे.तरच आपण कोरोनाचा वाढता संसर्ग रोखु शकतो.

          सध्या हवामानामुळे वातावरणात देखिल सतत बदल होताना दिसत आहे. त्यामुळे खोकला, ताप व सर्दी असे आजार नागरीकांच्यात वाढताना दिसत आहेत. त्यामुळे खाजगी दवाखाणे देखिल फुल्ल झालेले आहेत.वेळत उपचार न मिळाल्याने त्याचबरोबर कोरोनाविषयी मनात असलेल्या भितीमुळे रुग्ण दगावण्याच्या सख्येंत वाढ होऊ शकते. भितीमुळे काहीजण आपले आजार लपऊण स्वतःला घरीच कोंडुन घेताना दिसतात. त्यामुळे घरातील इतर व्यक्ति देखिल आजारी पडत आहेत. " माझे कुटुंब, माझी जबाबदारी " या सर्वेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा दिसते.

         प्रारंभी ठराविक गावात प्रवेश केलेल्या कोरोनाने आता तालुक्यातील प्रत्येक गावात वाडी वस्तीवर प्रवेश केला आहे. ह्याचे मुख्य कारण म्हणजे " माज काय व्हताय " म्हणुन घराबाहेर पडलेले नागरीक होय.आरोग्य विभागाच्या अहवालानुसार तालुक्यात कोरोना रुग्णांची सख्यांनऊशेच्यावर झालेली आहे. त्यापैकी जवळपास सातशेच्या आसपास रुग्ण बरे होऊण घरी परतले आहेत तर एकशे ऐंशी अजुन उपचार घेत आहेत. जवळपास तीस एक रूग्णांचा मुत्यु झाला आहे. त्यामुळे प्रशासणावर मोठा भार पडत आहे. बरेच रुग्ण स्वतः घरीच होम क्वांरटाईन होऊण उपचार घेताना दिसत आहेत.

       सध्या चंदगड तालुक्यातील कोरोनाची वाढती व्याप्ती पाहता "माज काय व्हताय" म्हणुन बाहेर पडण्यापेक्षा "मिया घरातच थांबणार" म्हणने योग्य ठरणार आहे.





No comments:

Post a Comment