'मास्क नाही? तर प्रवेश नाही, या उपक्रमा अंतर्गत कागणी येथे जनजागृती - चंदगड लाईव्ह न्युज

27 September 2020

'मास्क नाही? तर प्रवेश नाही, या उपक्रमा अंतर्गत कागणी येथे जनजागृती

कागणी : येथे माहिती फलक लावताना बाळासाहेब खवरे व इतर

कागणी / सी. एल. वृत्तसेवा

            "माझे कुटुंब माझी जबाबदारी " या मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकऱ्यांनी कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी गावो गावी अभिनव उपक्रम राबविले जात आहेत, त्यामध्ये मास्क नाही प्रवेश नाही,मास्क नाही वस्तू नाही,मास्क नाही सेवानाही, अशा प्रकारचे फलक गावो गावी लावण्याची मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत कागणी (ता. चंदगड) येथे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविस्तार अधिकारी बाळासाहेब खवरे व कोरोना कमिटीच्या सदस्यमार्फत गावातील किराणा दुकाने, दुध संस्था, सेवा सोसायटी या ठिकाणी "मास्क नाही? तर प्रवेश नाही" अशा प्रकारचे फलक लावून गावामधील लोकांना बाहेर जाताना तोंडाला मास्क वापरा, वारंवार हात धुवा, सुरक्षित अंतर ठेवा अशा प्रकारची जनजागृती करण्यात आली.

No comments:

Post a Comment