किणी येथे "माझे कुटुंब माझी जबाबदारी " अभियानातंर्गत कामकाजाची तपासणी - चंदगड लाईव्ह न्युज

27 September 2020

किणी येथे "माझे कुटुंब माझी जबाबदारी " अभियानातंर्गत कामकाजाची तपासणी

किणी येथे आरोग्य तपासणी करताना प्रशासक अरविंद सावळगी,बाळासाहेब खवरे,रणजित गणाचारी इत्यादी,

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

          कोरोना संसर्गासंदर्भात गावा गावा मध्ये 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियाना अंतर्गत आशा स्वयसेविका,अंगणवाडी सेविका माध्यमिक शिक्षक यांच्या मार्फत आरोग्य तपासणी केली आहे. पण गटविकास अधीकारी यांच्या आदेशानुसार 26 रोजी किणी येथे प्रशासक अरविंद सावळगी व ग्रामविस्तार अधिकारी बाळासाहेब खवरे यांनी घरोघरी जाऊन झालेल्या आरोग्य तपासणीची खात्री करून घेतली व काही कुटुंबाची फेरतपासणी हि केली व नागरिकांना आरोग्याबद्दल काटेकोर पणे खबरदारी घ्या तसेच मास्क नाही? तर प्रवेश नाही व बाहेर गावावरून येणाऱ्या वक्तीच्या तोंडावर मास्क नसेल तर गावामध्ये बंदी राहील अशा प्रकारच्या कडक सूचना ही केल्या. या वेळी पोलीस पाटील रणजित गणाचारी, दिलीप बिर्जे, विनायक बिर्जे, सौ. कांबळे,कोरोना कमिटी सदस्य, आशा सेविका,अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.



No comments:

Post a Comment