कोवाड पुलावरून पडून एका महिलेचा मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

26 September 2020

कोवाड पुलावरून पडून एका महिलेचा मृत्यू

पार्वती मारुती कांबळे

कागणी :  सी एल वृतसेवा

       कोवाड येथील जुन्या पुलावरून चालत जात असताना पाय घसरून नदीत पडल्याने एका महिलेचा बुडून मृत्यू झाला असल्याचे शनिवारी दुपारी स्पष्ट झाले. पार्वती मारुती कांबळे (वय-55, रा. कोवाड, ता. चंदगड) असे या महिलेचे नाव आहे. 

कोवाड येथील कोल्हापूर पद्धतीच्या याच बंधार्‍यावरून महिला नदीपात्रात पडली.

           याबाबत घटनास्थळ व पोलीस चौकीकडून मिळालेल्या माहितीनुसार पार्वती मारुती कांबळे (वय 55) या शुक्रवारी स्वतः आजारी असल्याने जुन्या पुलावरून किनी स्टँड वरील डॉ. हन्नुरकर यांचे कडे औषध उपचार घेण्यासाठी जात होत्या. या दरम्यान पुलावरून पडून पाय घसरून ताम्रपर्णी नदी पडल्या. त्या नदीपात्रात वा हत गेल्या. शनिवारी दुपारी बारापासून शोध मोहीम सुरू करण्यात आली. होती. या दरम्यानच्या चंदगड येथील प्रथमदर्शी आपत्कालीन सेवा संस्थेचे पथक दाखल झाले. या पथकाने   दुंडगे  गावच्या स्मशानभूमी पर्यंत नदी पात्रात शोध घेतला. दुपारी दोनच्या सुमारास पार्वती यांचा मृतदेह आढळला. पार्वती यांचा मुलगा राजाराम यांनी पोलिस चौकीमध्ये सदर वर्दी दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार मानसिंग चव्हाण करत आहेत. रेस्क्यू टीम चे प्रमुख श्रीपाद सामंत, पांडुरंग माईनकर, युवराज नौकुडकर, अजय सातार्डेकर, शिवाजी पाटील, गजानन मोहनगेकर, माजी सरपंच श्रीकांत पाटील, विद्यमान उपसरपंच विष्णू आढाव यांनी सुमारे दोन तास शोध मोहिमेसाठी परिश्रम घेतले. पोलीस चौकीचे एएसआय हनमंत नाईक, संतोष साबळे, अमर सायेकर, कुशाल शिंदे, साईनाथ मेघुलकर यांनी शोध मोहिमेचे नियोजन केले.

No comments:

Post a Comment