चंदगड तालुक्यात २८ गावे कोरोना हॉटस्पॉट, सर्वेक्षणासाठी २१० कर्मचाऱ्यांची नियूक्ती - चंदगड लाईव्ह न्युज

11 September 2020

चंदगड तालुक्यात २८ गावे कोरोना हॉटस्पॉट, सर्वेक्षणासाठी २१० कर्मचाऱ्यांची नियूक्ती

तेऊरवाडी - संजय पाटील
         कोविड-१९ अंतर्गत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचेकडून चंदगड तालूक्यातील २८ गावे कोरोना `हॉटस्पॉट` म्हणून  जाहिर केलेली आहेत. सदर गावांचा तात्काळ सर्वे करण्याचा आदेश शासनाने दिला असून यासाठी जवळपास ७० माध्यमिक व प्राथमिक शिक्षक, ७० अंगणवाडी सेविका व ७० आशा सेविकांची नेमणूक करण्यात आली आहे.
      याबरोबरच पर्यवेक्षक म्हणून सर्व केंद्रप्रमूख, तालूका सर्वेक्षण समन्वय अधिकारी म्हणून सौ. सुमन सुभेदार गटशिक्षणाधिकारी चंदगड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कुटूंबातील प्रत्येकाची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, श्वसनाचे आजार अशा रुग्णांचे सर्वैक्षण करून स्वॅबसाठी पाठवण्यात येणार आहे. संशयितांना स्वॅबसाठी पाठविण्याची जबाबदारी ग्रामसेवक, तलाठी व पोलिस पाटील  यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
                                     कोरोना हॉट स्पॉट गावे
अडकूर, आमरोळी, कुरणी, बुझवडे, नांदवडे, दाटे, नागनवाडी, किणे, कोवाड, राजगोळी बुं, मौ. कार्वे, माणगाव, सुंडी, हलकर्णी, बसर्गे, कुदनुर, तुर्केवाडी, होसूर, कालकुंद्री, तिलारीनगर, गवसे, हेरे, इब्राहिमपूर, निट्टूर, तेऊरवाडी, डुक्करवाडी व शिनोळी बु.
                                   हॉट स्पॉट गावांबाबत संभ्रम
कोरोना हॉट स्पॉटसाठी जाहिर केलेल्या काही गावांची नावे चुकीची आहेत. तर काही गावांमध्ये अधिक रुग्ण असूनही या गावांचा समावेशच नाही. तांबुळवाडी, बोंजुर्डी, सत्तेवाडी आदि गावे गायबच आहेत. तर मे मध्ये केवळ दोनच रूग्ण सापडलेले तेऊरवाडी गाव हॉटस्पॉट कसे ? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 
 
 

7 comments:

Unknown said...

सुंडी गाव पण हॉटस्पॉट कस काय इथे फक्त 2 ते 3 रुग्ण सापडलेत तरी कसं काय ही यादी बहुतेक चुकीची आहे...

Unknown said...

दाटे गावात फक्त ४ रुग्ण सापडलेत तेही संभ्रमात,मग दाटे गाव कसं काय hotspot?

Ashok Naukudkar said...

अगा, आमच्या किणयात तर एक पण रुगण न्हाय,तरी हाटस्पाट यादीत हाय.

भिकू दळवी said...

बुझवडे मध्ये केवळ २-३ रुग्ण सापडले मग हे हॉटस्पॉट कसे. आरोग्य विभागाचे डोके ठिकाणावर आहे का? का झोपेत रिपोर्ट बनवता. Ground वर कामे करत नाही निदान टेबल वर रिपोर्ट तरी नीट बनवा

भिकू दळवी said...

बुझवडे मध्ये एकही रुग्ण नाही, मग ते हॉटस्पॉट कसे झाले?

Unknown said...

कालकुंद्री येथे चार हजार लोकसंख्येला एक सापडलाय. तो पण पुण्यातून आलेला. स्थानिक एकही रुग्ण नाही तरीपण हॉटस्पॉट मध्ये गावाचं नाव आलेलं आहे.

Unknown said...

आरोग्य विागामार्फत नीट चौकशी होत नाही. आणि तपासणी पण होत नाही काही तरी चुकीचे रिपोर्ट तयार करून गावांची नावे घोषित करण्यात येत आहेत हे कुठं तरी थांबलं पाहिजे

Post a Comment