सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेलच्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका - या मालिकेविषयीच्या वाचकांच्या प्रतिक्रिया
सापाचे संग्रहित छायाचित्रसी. एल. न्यूज चॅनेलच्या सर्व वाचकांना मनःपूर्वक नमस्कार,
मागील दोन महिन्यात आपणासमोर सापांची माहिती देणारी ३८ भागांची मालिका सुरू होती. या मालिकेच्या शेवटाकडे जात आहे. काही वेळा महापूर, नेटवर्क व तंत्रिक समस्येमुळे मालिका खंडित होऊनही आपण भरभरून प्रतिसाद दिलात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडीसह सर्व ठिकाणचे नागपंचमी उत्सव रद्द करण्यात आले होते. त्यामुळे चंदगड लाईव्ह न्युज चॅनेलचे संपादक संपत पाटील तसेच पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी नागपंचमी पासून सी. एल. न्यूजच्या वाचकांसाठी सापांची माहिती देणारी मालिका सुरू करावी. याबाबत चर्चा होवून एकमत झाल्यानंतर हि जबाबदारी श्रीकांत पाटील यांच्यावर सोपवली. त्यांनी हो-ना म्हणत त्याला होणार दिला. ढोलगरवाडीचे सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील, शेतकरी शिक्षण मंडळ व सर्पशाळेचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे, निवृत्त वन अधिकारी भरत पाटील आदींचे मार्गदर्शन व सहकार्यातून मालिकेला प्रारंभ झाला. याला केवळ चंदगड नव्हे तर कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्रास इतर राज्ये व परदेशातील सी. एल. न्युजच्या वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल चंदगड लाईव्ह न्युज च्या वतीने सर्वांचे शतशः धन्यवाद! पुढील काळातही 'आपल्या हक्काचे व्यासपीठ' असलेल्या सी. एल. न्यूजला सर्वांनी ताकद द्यावी अशी आशा आहे.
मालिका संपादक :- श्रीकांत व्ही. पाटील, कालकुंद्री ता. चंदगड. (उपाध्यक्ष- चंदगड तालुका पत्रकार संघ)
सी. एल. न्यूजच्या अवाहनावरून मालिकेविषयी अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया प्रसारित करत आहोत.
---------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया क्र. १
खरंतर नेहमी त्याच त्याच नकारात्मक खून, दरोडे, चोऱ्या, बलात्कार, राजकिय प्रसिदी साठी केलेली भाषणे, अपघात, वाढदिवस अशा बातम्यांनी आपण भांबावून गेलेलो असतो. या पार्श्वभूमीवर एक वेगळी ज्ञानांत भर टाकणारी, जीवनाशी निगडीत अशी सापांविषयी माहिती देणारी मालिका चंदगड लाईव न्यूज मार्फत सुरु केलीत. खूपच छान! सविस्तर अभ्यासपूर्वक मांडणी करून आम्हा वाचकांना एक नविन विषय दिलांत, जनजागृती केलीत. त्याबदल आपले मनपूर्वक आभार! मी स्वत: या विषयाची माहीती घेताना आवडीने सर्व वाचत होतो. मित्रांना पाठवत होतो. नैसर्गिक जीवांबद्दल मार्गदर्शन केलेबदल आपले अभिनंदन आणि धन्यवाद!!
- सोमनाथ गवस, चंदगड (सहसचिव जेष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) कोल्हापूर)
-------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया क्र. 2
![]() |
तानाजी वाघमारे |
गेली ५४ वर्षे आम्ही शेतकरी शिक्षण मंडळ ढोलगरवाडीच्या सत्यशोधक वाघमारे सटुपा टक्केकर ज्युनियर काॅलेज, मामासाहेब लाड विद्यालय व संस्थेच्या इतर शाळांतून विद्यार्थ्यांना सापांविषयी शास्त्रीय माहिती देण्याचे कार्य करतो.
आज पर्यंत लाखो लोकाना सर्पसज्ञान व हजारोना सर्पमीत्र केले. ते देशभर वन्यजीव वाचविण्यासाठी कार्यरत आहेत. भारतातील आद्य सर्प मित्र म्हणून कै बाबुराव टक्केकर यांचे नाव घेतले जाते. तो वारसा आणि व्याप्ती वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. श्रीकांत, आपण सापांची माहिती देणारी मालिका हा फार चांगला उपक्रम राबवण्यात यशस्वी झालात! म्हणून मी आपले व सी एल न्यूज चे कौतुक करतो! धन्यवाद.
तानाजी वाघमारे (उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक- सर्पोद्यान, शेतकरी शिक्षण मंडळ ढोलगरवाडी) मो. 98336 77854.
---------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया क्र. 3
![]() |
सटुप्पा आप्पाण्णा फडके |
नुसता 'साप ' शब्द जरी ऐकला तरी भल्याभल्यांच्या तोंडून 'बाप ' बाहेर पडतो. मग प्रत्यक्ष साप पाहिल्यानंतर काय अवस्था होत असेल? पण याच सापांविषयी असलेली शास्त्रशुद्ध माहिती देऊन सर्व गैरसमज दूर करून मनातील भीती काढून टाकण्याचे काम निश्चितपणे या मालिकेने केले आहे, याबाबत दुमत नाही. साप सुद्धा निसर्गाचा घटक आहे; त्यांना जगू द्या! असा पर्यावरणप्रेमी संदेश यातून मला व सर्वांना मिळाला. कोरोनाच्या महासंकट काळात सुरक्षितपणे आपल्या परीने एक नवीन विषय घेऊन त्याला न्याय देण्याचा प्रयत्न 'चंदगड लाईव्ह न्यूज' ने केला आहे. अशाच समाजजागृतीपर नवनवीन मालिका यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा व आपल्या कार्यास सलाम !!
सटुप्पा आप्पाण्णा फडके (माणगाव, ता. चंदगड, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त , विषय शिक्षक वि. मं. केंचेवाडी)
-----------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया क्र. 4
![]() |
साई एम पाटणकर |
- साई एम पाटणकर (अहमदाबाद गुजरात)
-----------------------------------------------------------------------------
2 comments:
साप हा वन्यजीव मात्र त्याच्या विषयी प्रचंड भीती,विषारी व बिनविषारी हा भेद कळला की विनाकारण होणारी सर्प हत्या थांबेल, यासाठी ढोलगरवाडी संस्था व शाळा खूप खूप कष्ट घेते आहे त्याबद्दल त्यांचे आभार व आपण आपल्या चॅनेल च्या माध्यमातून हा महत्त्वाचा विषय सर्वांपर्यंत पोहोचविला यासाठी आपले मनस्वी आभार व धन्यवाद
साप वाचला तरच शेती वाचेल, निसर्ग टिकेल
खूप खूप शुभेच्छा
दत्ता पाटील RFO पाटणे ad
साप म्हटले की बरेचजण घाबरतात तर काही त्याच्या जीवावर उठतात . पण आपण दिलेल्या या मालिकेमुळ सापांतिषयीची भिती कमी होवून त्यांचा आदर वाढला आहे .
समाजामध्ये शापांविषयीची भावना नक्कीच बदलन्यास या आपल्या मालिकेचा उपयोग होणार यात काही शंकाच नाही .
आपले हे कार्य याप्रकारे अखंड चालू ठेवून आपण सापाविषयी लोकांच्यामध्ये जनजागृती करावी तसेच आपल्या या कार्यास आमच्याकडून शुभेच्छा .
मा श्री शरद दिनकर पाडळकर .
जनता युवा दल अद्यक्ष राधानगरी .
Post a Comment