उमाजी राजे नाईक जयंती साधेपणाने करण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

06 September 2020

उमाजी राजे नाईक जयंती साधेपणाने करण्याचे आवाहन

कालकुंद्री (प्रतिनिधी) 
          आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांची  सात सप्टेंबर रोजी होणारी २२९ वी जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन जय मल्हार क्रांती सेनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे व राज्य कार्यकारिणी सदस्य अमोल नाईक (कोवाड) यांनी केले आहे.
     स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहणारे तसेच इंग्रजी सत्तेविरुद्ध सशस्त्र बंड पुकारणारे पहिले क्रांतिकारक म्हणून उमाजी राजे नाईक यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे दरवर्षी राजे उमाजींची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी केली जाते. तथापि यावर्षी कोरोना  विषाणू च्या वाढत्या प्रकोपामुळे समाज बांधवांसह सर्वांनी घरच्या घरी प्रतिमा पुजन व त्यांच्यावरील पुस्तकांचे वाचन करून अभिवादन करावे. सार्वजनिक ठिकाणी पुजन वेळी शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment