नागरदळेचे सुपुत्र व एमआयएचे पोलीस हवालदार संदीप पाटील यांना आदर्श प्रशिक्षक पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

06 September 2020

नागरदळेचे सुपुत्र व एमआयएचे पोलीस हवालदार संदीप पाटील यांना आदर्श प्रशिक्षक पुरस्कार

संदीप पाटील
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
          मूळचे नागरदळे (ता. चंदगड) येथील सुपुत्र व सध्या हडपसर, ससानेनगर, पुणे येथील पोलीस हवालदार संदीप राम पाटील यांना महाराष्ट्र पोलीस दलातील प्रशिक्षण केंद्र मधील सन 2019 -2020 चा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
          शनिवार (दि. 5) रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून  हडपसर, रामटेकडी येथील एमआयएच्या कार्यालयात विशेष पोलीस महानिरीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक शिरीष इनामदार, विजयकुमार पळसुले (उपसंचालक प्रशिक्षण ), पोलीस निरीक्षक महेश थिटे (उपसंचालक प्रशासन) यांच्यासह प्रबोधिनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
       त्यांना वडील व निवृत्त पोलिस उपअधीक्षक राम नागोजी पाटील व पत्नी अश्विनी पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. संदीप पाटील हे पाच वर्षापासून एमआयए येथे कार्यरत असून यापूर्वी त्यांनी एसआरपीएफ ग्रुप 1, पुणे येथे  १० वर्षे सेवा बजावली आहे. पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.


No comments:

Post a Comment