पार्ले,सावंतवाडी परिसरात हत्तींचा धुडगुस, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन, ग्रामस्थांचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

13 September 2020

पार्ले,सावंतवाडी परिसरात हत्तींचा धुडगुस, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन, ग्रामस्थांचा इशारा

पार्ले,सावतवाडी  येथे भात व ऊस पिकांचे हत्तीने केलेले नुकसान.
चंदगड / प्रतिनिधी
 चंदगड तालुक्यातील वाघोत्रे -गुडवळे,पार्ले, कळसगादे, जेलूगडे,सावतवाडी  परिसरात हत्तीच्या कळपाकडून नूकसानीचे सत्र सूरू असून शेतकरी मेटाकूटीस आले आहेत. भात, नाचना, ऊस,चिवे (मानगे) यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामूळे सर्व शेतकरी हतबल झाले आहेत.
        सावतवाडी येथील परिसरात हत्तीनी धुमाकूळ घालून भाताचे मोठ्या प्रमाणात हानी केली आहे.या हत्तीमध्ये नर, मादी व एक पिल्लू असा समावेश आहे.या घटनास्थळी दत्तू बाळा सावंत या शेतकऱ्याचे भाताचे मोठे नुकसान झाले आहे.तसेंच यामधे अर्जुन बाळा सावंत, गोविंद बाळा सावंत, मारुती बाळा सावंत इत्यादी शेतकऱ्याचेही नुकसान झाले आहे.सदर घटनास्थळी जावून वनविभागानी पाहणी करून पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील परिसरातून होऊ लागली आहे.
      पार्ले  गावात हत्तीच्या कळपाने शेतकऱ्यांच्या पिकांचे हजारोंचे नुकसान केले.  यामध्ये रामकृष्ण जाणकू गावडे, सुर्यकांत खाचू गावडे, नारायण चाळू गावडे, महादेव गणू गावडे, रामू पुंडलीक गावडे, बाबू नारायण गावडे, ओमाणा तानाजी मयेकर, नंदू  झिलु गावडे आदी शेतकऱ्यांच्या भात, नाचणी पिकासह बांबू चेही नुकसान केले आहे.  गेल्या आठवड्यात वाघोत्रे येथील माजी सरपंच मारुती गावडे ,राजाराम घुमे, भिवा गावडे 
या शेतकऱ्यांचे ऊस,भात, फळझाडे, मेसकाठी या पिकांचे नुकसान केले होते. या शेतकऱ्यांना अजून नुकसान  भरपाई मिळाली नाही.  तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या महिन्यापासून  हत्तीच्या एक कळपाने धुमाकूळ घालून शेतीचे नुकसान केले होते.त्यांची तक्रार वनविभागाकडे केली असताना सुद्धा वनविभाग कानाडोळा करत असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत. मागील पंधरा दिवसापासून हत्तीचा वावर गुडवळे परिसरात असून शेतकऱ्यांचे रोजच हत्तीकडून नुकसान सुरूच असल्याने शेती करावी की सोडून द्यावी,अशा मानसिकतेत शेतकरी  आहेत. हातातोंडाशी आलेली  पिके हत्तीकडून जमीनदोस्त होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वनविभागाने याकडे लक्ष न दिल्यास येत्या काही दिवसात  पार्ले, वाघोत्रे, गुडवळे ग्रामस्थ चंदगड परिक्षेत्र वन कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा वाघोत्रेचे सरपंच संतोष गावडे यांनी सांगितले.ज्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात हत्तीचा वावर आहे त्या क्षेत्रात सौर ऊर्जेचे कुंपण देण्याची मागणी गुडवळे गावच्या सरपंच तन्वी धुरी यांनी केली आहे. वारंवार  होणाऱ्या शेतीची नुकसानभरपाई बाजारभावाप्रमाणे मिळावी व वनविभागाने हत्ती हटाव मोहीम काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ,अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment