कोवाड महाविद्यालयात शिक्षक दिन संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

05 September 2020

कोवाड महाविद्यालयात शिक्षक दिन संपन्न

सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मान्यवर
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
          येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड (ता. चंदगड)  येथे सांस्कृतिक विभागाच्यावतीने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन अर्थात शिक्षक दिन संपन्न झाला. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत  विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. डी. कांबळे यांनी केले. त्यानंतर  डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य व्ही. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रतीमा पूजनानंतर प्राचार्य व्ही. आर. पाटील यांनी राधाकृष्णन यांच्या कार्याचा आढावा घेतला. प्रा. डॉ. बी. एस. पाटील, प्रा. आर. टी. पाटील यांची  मनोगत झाले. प्राचार्य व्ही. आर. पाटील म्हणाले, ``आजच्या कोरोना काळात सामाजिक अंतर ठेवून विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. अशा या परिस्थितीत सांस्कृतिक विभाग  सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आमच्या महाविद्यालयात साजरा करत असताना खूप काळजी घेतली जात आहे. अलीकडचा काळ भयावह आहे आणि त्यामुळे विद्यार्थी शिक्षक आणि समाज यांना सुव्यवस्थित नेणारा घटक शिक्षक म्हणून महत्वाची कामगिरी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी बजावली उपराष्ट्रपती व व राष्ट्रपती  पदापर्यंत पोहोचलेल्या कृष्णन्याने समाजाच्या राष्ट्राच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे योगदान दिले. म्हणूनच आज देशभर अत्यंत साध्या पद्धतीने कृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा होत आहे. प्रास्ताविक आणि स्वागत प्रा. डॉ. आर. डी. कांबळे केले. आभार दयानंद पाटील यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रशासकीय सेवक कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रम पार पाडण्यात आला.

No comments:

Post a Comment