मातृभाषेतून घेतलेले शिक्षण अधिक प्रभावी -राजेंद्र कुमार गोंधळी, ग्रामीण भागातला शिक्षणदिनी रंगला डिजीटल कर्तृत्वाचा सोहळा - चंदगड लाईव्ह न्युज

08 September 2020

मातृभाषेतून घेतलेले शिक्षण अधिक प्रभावी -राजेंद्र कुमार गोंधळी, ग्रामीण भागातला शिक्षणदिनी रंगला डिजीटल कर्तृत्वाचा सोहळा

दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
        मातृभाषेतून घेतलेले शिक्षण अधिक प्रभावी ठरते. असे मत राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राजेंद्र कुमार गोंधळी यांनी मांडले.चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात ९१पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या २१५ विद्यार्थ्यना व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या ३० शिक्षकांचा ई-प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
          प्रमुख पाहुणे राजेंद्र गोंधळी पुढे म्हणाले ' कष्टाने मिळविलेले यश चिरकाल टिकते.यशासाठी मध्यममार्ग निवडण्यापेक्षा पायाभूत ज्ञानाची आस धरणे गरजेचे आहे.विद्यार्थांनी याची जाणीव ठेवून अध्ययन केल्यास त्याचा जीवनामध्ये चांगला उपयोग होईल. अध्यापकांनी ज्ञान रचना वादाबरोबरच  डिजीटल युगाची कास धरणे ही काळाची गरज आहे. '
       प्रास्ताविक संजय साबळे यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय एच.आर. पाऊसकर यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी संघाचे अध्यक्ष एम. एन. शिवणगेकर होते. भावेश्वरी संदेश विद्यालय कानूर विद्यार्थिनी कु. अंजली अनिल कोठारी हिने मराठी विषयात १००पैकी ९९ गुण मिळविल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
         यावेळी जी.आर. कांबळे, सौ. आश्विनी देवण , मुख्याधापक आर.आय. पाटील, प्राचार्य ए.एस. पाटील , प्राचार्य व्ही.जी. तुपारे,सुभाष बेळगांवकर, शिक्षण विस्तार अधिकारी एम.टी. कांबळे , राजेंद्र खोराटे यांची मनोगते झाली.
         कार्यक्रमाला व्ही.एल. सुतार, एस.पी. पाटील रेखा बल्लाळ, एफ.एम. मुल्ला, संगीता पाटील संभाजी सातर्डेकर, एन.पी. हिशेबकर, स्वाती पाटील, सुरेश नाईक, जी.आर. धुमाळे , आर .जी. इनामदार, एम.वाय. पाटील, जयवंत कोकीतकर, आर.जे. मस्कर, पी.बी. चौगुले , सौ.एस  पी पाटील आदि शेकडो अध्यापक या ऑनलाईन सोहळ्यास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र पाटील यांनी केले तर आभार बी.एन. पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment