शिनोळी येथे माझं कुटुंब- माझी जबाबदारी योजनेचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

16 September 2020

शिनोळी येथे माझं कुटुंब- माझी जबाबदारी योजनेचा शुभारंभ

शिनोळी येथे माझं कुटुंब- माझी जबाबदारी योजनेचा  शुभारंभ प्रसंगी प्रभाकर खांडेकर व इतर. 
चंदगड / प्रतिनिधी
    शिनोळी खुर्द (ता. चंदगड) येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतुन 'माझं कुटुंब- माझी जबाबदारी "या योजनेचा शुभारंभ.शिवसेना उपजिल्हा प्रमुख व दक्षता कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. गावातील  प्रत्येक कुटुंबातील १० वर्षाच्या आतील व ६० वर्षा पुढे वय  असलेल्या रूग्णांचे ऑक्सिजन, तापमान, सर्दी,खोकला    आदी बाबत आरोग्य पथकाने माहिती गोळा करण्यास सुरवात केली. 
कोरोना रोगावर मात करून ठणठणीत बरे होऊन आले बद्दल ग्रामस्थांच्या वतीने प्रभाकर खांडेकर यांचे 
जि.प.सदस्य अरुण सुतार यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. 
      यावेळी माजी सरपंच नम्रता पाटील, प्रशासकीय आधिकारी ठोंबरे, जि. प. सदस्य अरूण सुतार, पं. स. सदस्या सौ. रूपाताई खांडेकर, तालुका संघांचे संचालक परशराम पाटील, बाळासाहेब पाटील, भैरू खांडेकर, प्रताप सुर्यवंशी, मारूती पाटील, दादा ओऊळकर, निंगापा मनोळकर , माजी सरपंच भरमा वैजू.पाटील, वैजनाथ पाटील,  निंगापा पाटील, डाॅ. जोशी, आरोग्य केंद्राच्या आशा सेविका सौ. खांडेकर, श्री. सुर्यवंशी, श्री. पाटील उपस्थित होते. यावेळी कोरोना रोगावर मात करून ठणठणीत बरे होऊन आले बद्दल ग्रामस्थांच्या वतीने जि. प. सदस्य अरून सुतार यांनी प्रभाकर खांडेकर यांचे स्वागत केले. 

No comments:

Post a Comment